पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 
खगोलीय अंतरे मोजण्याच्या पद्धती
 

पृथ्वीवर एखाद्या गोष्टीची लांबी-रुंदी अथवा आकार मोजण्यासाठी आपण तीच्या आकारानुसार मोजण्याची पद्धत वापरतो. जसे साधारणपणे लहान वस्तू मोजण्यासाठी मिलीमिटर, सेंटीमिटर, इंच, फूट पासून ते पूढे मीटर व किलोमीटर अशी मोजण्याची साधने आपण वापरतो. पृथ्वीवरील एखादी वस्तू मोजण्यासाठी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाऊन मोजणे सहज शक्य होते, परंतू आकाराने मोठ्या आणि पृथ्वीपासून दूर असलेल्या गोष्टी मोजणे तितकेसे सोप्पे नाही. त्यासाठी त्यानुसार अंतर अथवा आकार मोजण्याच्या पद्धती बदलतात.

पृथ्वीपासून एखादे जवळचे म्हणजेच पृथ्वीच्या चंद्राचे अंतर मोजायचे झाल्यास ते किलोमीटरमध्ये साधारण ३,८४,००० कि.मी. इतके होते. परंतू नंतर त्यापूढील अंतर प्रचंड मोठी असल्याने ती किलोमीटरमध्ये मोजणे शक्य होत नाही. जसे पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर साधारण १४,९५,९८,००० किलोमीटर इतके होते. अशी मोठी अंतरे किलोमीटरमध्ये मोजणे शक्य नसल्याने त्यासाठी 'खगोलीय एकक'  (Astronomical Unit - A.U.) ही पद्धती वापरतात.

सूर्य-पृथ्वी अंतर १ A.U. म्हणजेच खगोलीय एकक असे मोजले जाते म्हणजेच १ A.U. म्हणजेच खगोलीय एकक = १४,९५,९८,००० किलोमीटर इतके होते.

परंतू नंतर त्यापूढे खगोलीय वस्तूंची अंतरे इतकी जास्त आहेत की पूढे ती खगोलीय एककामध्ये मोजणे देखिल शक्य होत नाही त्यासाठी 'प्रकाश वर्ष' (Light Year) ही पद्धती वापरतात.

'प्रकाश' ठराविक काळामध्ये किती अंतर पार करतो यावरुन हे अंतर मोजले जाते. प्रकाशाचा वेग प्रचंड आहे.

एका सेकंदामध्ये प्रकाश  २,९९,७९२.४५८  कि.मी. इतके अंतर पार पाडतो.

   

एका मिनिटामध्ये प्रकाश १,७९,८७,५४७.४८   कि.मी.  इतके अंतर पार पाडतो.

   

एका तासामध्ये प्रकाश १,०७,९२,५२,८४८.८   कि.मी.  इतके अंतर पार पाडतो.

   

एका दिवसामध्ये प्रकाश २५,९०,२०,६८,३७१.२  कि.मी.  इतके अंतर पार पाडतो.

या वेगाने प्रकाश

एका वर्षामध्ये प्रकाश ९४,६०,००,००,००,०००  कि.मी. (९.४६०५२८४ x  १०१२इतके अंतर पार पाडतो.

चंद्र-पृथ्वी अंतर ३,८४,००० कि.मी. इतके आहे तर प्रकाश देखिल एका सेकंदामध्ये साधारण तितकेच अंतर पार करतो. तर सूर्यापासून निघालेला प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ८.३ मिनिटे लागतात.

१ A.U. म्हणजेच खगोलीय एकक =  ८.३ प्रकाश मिनिटे

सूर्यानंतर पृथ्वीपासून जवळ असलेल्या नरतुरंग तारकासमुहातील 'मित्र' (Alpha Centauri)  तार्‍याचे अंतर आपल्यापासून ४ प्रकाशवर्षे इतके आहे. म्हणजेच प्रकाशाला प्रती सेकंद २,९९,७९२.४५८  कि.मी. या वेगाने प्रवास करीत 'मित्र'  तार्‍यापासून पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ४.४ वर्षे लागतात.

सूर्यमाला असलेल्या आपल्या आकाशगंगेचा आकार इतका प्रचंड आहे की प्रकाशाला आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी १ लाख वर्षे लागतात. तर आपल्या आकाशगंगेच्या शेजारची आकाशगंगा असलेल्या 'देवयानी आकाशगंगेपासून'  निघालेल्या प्रकाशाला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास २२ लाख प्रकाशवर्षे लागतात.

खगोलीय अंतर मोजण्यासाठी 'पराशर'  म्हणजेच पार्सेक (Parsec) हि देखिल पद्धती वापरली जाते. अत्यंत दूरवरील म्हणजेच आकाशगंगेबाहेरील गोष्टींची अंतरे मोजण्यासाठी 'पराशर'  म्हणजेच पार्सेक पद्धती वापरली जाते.

१ प्रकाशवर्ष म्हणजेच ९४,६०,००,००,००,००० किलोमीटर

   

१ प्रकाशवर्ष म्हणजेच ६३२३६.१९४ खगोलीय एकक (A.U.)

   

१ प्रकाशवर्ष म्हणजेच  ०.३०६५९५१६ पार्सेक

   

१ पार्सेक म्हणजेच ३.२६१६३ प्रकाशवर्ष

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी