पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 
चंद्राच्या कलेवरुन अमावास्या आणि पौर्णिमांचे गणित !
 

प्रत्यक्षात जरी चंद्र पश्चिम ते पूर्व असा पूढे सरकत असला तरी पृथ्वीचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग जास्त असल्याने चंद्र पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकण्याएवजी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतो.

चंद्राला पृथ्वीभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण २९ दिवस लागतात. तो पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे असा पूढे सरकत असतो. परंतू पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी २४ तास लागत असल्याने चंद्र पृथ्वीवरुन पूढे सरकताना दिसण्या एवजी पृथ्वी वेगात गोल फिरत असल्याने चंद्र मागे सरकताना दिसतो, परीणामी तो पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकताना दिसण्या एवजी एका रात्रीमध्ये तो पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतो. परंतू असे जरी असले तरी प्रत्यक्षात चंद्राचे पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणे सतत चालू असल्याने एखाद्या रात्री चंद्र आपल्याला ज्या ठिकाणी आढळेल त्याच्या दुसर्‍य रात्री चंद्र आपल्याला त्यावेळेस आदल्या रात्रीच्या थोडासा पूढे पूर्व दिशेला सरकलेला आढळेल.

एखाद्या संपूर्ण रात्रीमध्ये चंद्र आकाशामध्ये न दिसल्यास तो सूर्याच्या जवळ असून त्यावेळी आमावस्या आहे हे स्वाभाविक आहे.

इतर वेळेस जर रात्रीच्या वेळेस चंद्र आकाशामध्ये दिसल्यास त्यावरुन अमावास्या अथवा पौर्णिमा कधी होणार आहे याचे गणित अगदी सहज करता येते.

जर सूर्यास्तानंतर अथवा मध्यरात्रीपूर्वी आकाशामध्ये आपल्याला चंद्राची अर्धी बाजू दिसत असेल म्हणजेच "अर्धचंद्र बिंब" दिसत असेल तर त्या रात्री चंद्र साधरणपणे मध्यरात्रीपर्यंत पश्चिमेला मावळता दिसेल. याचाच अर्थ तेव्हा चंद्राची 'शुक्ल अष्टमी' कला असून साधारण आठ दिवसांपूर्वी अमावास्या होती व साधारण आठ दिवसांनंतर पौर्णिमा असेल.

   

वरील प्रमाणेच परंतू जर सूर्योदयानंतर व दिवसा दुपार होण्याआधी आकाशामध्ये आपल्याला चंद्राची अर्धी बाजू दिसत असेल म्हणजेच "अर्धचंद्र बिंब" दिसत असेल तर त्या दिवशी चंद्र साधारणपणे संध्याकाळपर्यंत पश्चिमेला मावळता दिसेल. याचाच अर्थ तेव्हा चंद्राची 'कृष्ण अष्टमी' कला असून साधारण आठ दिवसांपूर्वी पौर्णिमा होती व साधारण आठ दिवसांनंतर अमावास्या असेल.

   

पहाटे सूर्योदयापूर्वी 'पूर्व क्षितिजावर' चंद्राची कोर दिसत असेल तर याचाच अर्थ तेव्हा साधारण 'कृष्ण एकादशी' कला असून पूढे साधारण ३-४ दिवसांमध्ये 'अमावास्या' होणार आहे.

   

संध्याकाळी सूर्यास्तानंतर 'पश्चिम क्षितिजावर' चंद्राची कोर दिसत असेल तर याचाच अर्थ तेव्हा साधारण 'शुक्ल चतुर्थी' कला असून साधारण ३-४ दिवसांमध्ये 'अमावास्या' झाली असावी.

   

संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जर पूर्व क्षितिजावर चंद्राचे साधारण गोलाकार बिंब दिसत असेल तर तेव्हा चंद्राची 'शुक्ल एकादशी' कला असून साधारण ३-४ नंतर दिवसांनंतर 'पौर्णिमा' होणार आहे.

   

संध्याकाळी सूर्यास्तानंतर जर पूर्व क्षितिजावर चंद्राचे साधारण गोलाकार बिंब दिसत असेल तर तेव्हा चंद्राची 'कृष्ण चतुर्थी' कला असून साधारण ३-४ दिवसांपूर्वी 'पौर्णिमा' झाली असावी.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी