पृथ्वीवर मार्गदर्शनासाठी दिशा उपयोगी पडतात. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य तसेच डोक्यावर आणि पायाखाली अशा दहा दिशा आपण दररोजच्या आयुष्यामध्ये वापरतो. पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाची अचूक जागा सांगायची असल्यास अक्षांश आणि रेखांश या सज्ञा वापरल्या जातात. पण आकाशामध्ये एखादा तारा आपण जेव्हा बघतो तेव्हा त्याची दिशा सांगताना निराळ्याच सज्ञा वापरल्या जातात. या संज्ञांची माहिती खाली दिली आहे.
मरीडियन - आयनिक मध्य - (Meridian) - एक काल्पनिक गोल रिंगण जे उत्तर दक्षिण दिशांमधून जाते व ज्यामुळे पूर्व व पश्चिम असे आकाशाचे दोन भाग पडतात. तसेच हे रिंगण निरीक्षकाच्या जागेवर देखिल अवलंबून आहे.
ऍल्टीट्युड (Altitude) - क्षितिजा पासून वर आकाशात ख-स्वस्तिक (Zenith) पर्यंत अंशामध्ये मोजलेले अंतर.
ऍझिमथ (Azimuth) - असे अंतर जे क्षितिजाला समांतर व उत्तर दिशेपासून मोजले जाते.
संपात बिंदू - इक्विनॉक्स (Equinox) - असे दोन बिंदू जेथे सूर्याचा आयनिक मार्ग हा पृथ्वीच्या विषुववृत्तास छेदतो. ह्या दोन बिंदूंना वसंत आणि शरद असे म्हणतात. दरवर्षी सूर्य २१ मार्च रोजी वसंतसंपात बिंदूवर असतो तर २२ सप्टेंबर रोजी शरद संपात बिंदूवर असतो.