पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

हाताच्या साहाय्याने तार्‍यांमधील अंतर मोजणे

 

खालील चित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे हाताचा वापर केल्यास कोणत्याही प्रकारचे साधन न वापरता आपण हाताच्या साहाय्याने आकाशातील दोन तार्‍यांमधील दृश्य अंतर अंशामध्ये मोजू शकता.

अशा प्रकारे अंतर मोजताना आपला हात सरळ नाकासमोर पकडून एका डोळ्याने हाताच्या रचनेकडे पाहून अंतर मोजावे.

 

१. सरळ हात करून हाताच्या करंगळीने १ अंश अंतर मोजता येते, तर दुसर्‍या बोटाच्या ( तर्जनी ) साहाय्याने अर्धा अंश अंतर मोजता येते.

 

२. हातची मधली तीन बोटे सरळ रेषेमध्ये पकडून ५ अंश अंतर मोजता येते.

 

 

३. हाताची मूठ सरळ रेषेमध्ये पकडून १० अंश अंतर मोजता येते.

 

 

४. करंगळी आणि दुसरे बोट ( तर्जनी ) सरळ पकडून १५ अंश अंतर मोजता येते.

 

 

५. सरळ हात धरून अंगठा आणि करंगळी ताणून धरल्यास ( वित ) २५ अंश अंतर मोजता येते.

 

 

प्रत्येक वयाच्या मानाने त्याच्या हाताची लांबी व आकार वेगवेगळा असल्याने अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने मोजलेल्या अंतरामध्ये थोडाफार फरक असू शकतो.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी