पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

क्वेसार

 

खगोलशास्त्राद्वारे वापरल्या जाणार्‍या दुर्बिणीद्वारे प्रकाशमान तारे, तेजोमेघ अथवा आकाशगंगांना पाहता येते. परंतु मानवी डोळ्यांना न दिसणार्‍या रेडिओ लहरी ग्रहण करण्यासाठी रेडिओ टेलेस्कोप (दुर्बीण) वापरली जाते. ज्याद्वारे एखाद्या अवकाशीय गोष्टी मधून उत्सर्जित होणार्‍या लहरींचा अभ्यास केला जातो.

अवकाशामध्ये अशी अनेक ठिकाणे शोधण्यात आली आहेत. जेथून फक्त रेडिओ लहरी येतात परंतु प्रकाश नसल्याने त्या डोळ्यांना दुर्बिणीद्वारे दिसत नाहीत. अशा गोष्टींना 'क्वेसार' ( Qausi-Stellar Radio Sources (Quasar)) असे म्हणतात.

अधिक संशोधनानंतर असे आढळून आले की हे रेडिओ स्रोत असलेले हे तारे आपल्या आकाशगंगेतील नसून ते इतके दूर आहेत जेथे फक्त अत्यंत दूरवरच्या आकाशगंगाच आढळतात. आतापर्यंतच्या संशोधनामुळे असे आढळून आले आहे की हे क्वेसार एखाद्या महाकाय आकाशगंगेच्यामध्ये असून बहुदा त्या आकाशगंगेमध्ये असलेल्या महाराक्षसी कृष्णविवरामुळे तेथे मोठ्याप्रमाणात चुंबकीयबदल होत असतात.

या क्वेसारांची निर्मिती त्या आकाशगंगांच्या निर्मितीच्या सुरवातीच्या टप्प्यामध्येच झालेली आढळते. असे असले तरी क्वेसारची निर्मिती कशी होते याचा अजून शोध लागलेला नाही.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी