पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

भरणी :-

अश्विनी नक्षत्रांच्या तीन चांदण्यांच्या विशालकोनापुढेच आपणास आणखी एक तीन चांदण्यांचा त्रिकोण आढळतो. तेच भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्राचा देखिल समावेश मेष राशीमध्ये होतो. अश्विनी नक्षत्रानंतरचे हे दुसरे नक्षत्र.

पाश्चिमात्यांनी यास 'ट्रँग्युलम' हे नाव दिले आहे. याचा अर्थ त्रिकोण.

नक्षत्रगणनेत अश्विनी नंतर लगेच भरणीचा क्रमांक येतो. परंतु का कुणास ठाऊक या भरणी नक्षत्राबद्दल कुणीही फारसे बोलत नाही. तसेच यांच्या संबंधात एखादी कथाही आढळत नाही. खगोलशास्त्रीय ग्रंथातून देखिल भरणी बद्दल फार तुटपुंजी माहिती आढळते.

भरणी नक्षत्र अशुभ असल्याचे भारतात प्राचीन काळापासून मानले जाते. याचे नेमके कारण सापडत नाही. भरणीने यमाशी नाते जोडले आहे. (यामुळेच बहुदा भरणीच्या वाट्याला दूषण आले असावे.) असा उल्लेख येतो, पण याचा नेमका अर्थ उलगडत नाही.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी