पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

रोहिणी :-

कृत्तिका नक्षत्राच्या बाजूलाच आपणास रोहिणी नक्षत्र आढळेल. हिवाळ्यात अवकाशामध्ये हे नक्षत्र देखिल शोधणे फार अवघड नाही. ह्या नक्षत्राचा आकार इंग्रजी व्ही (V) ह्या अक्षराप्रमाणे आहे. ह्या आकाराच्या उजव्या बाजूचा सर्वात वरील तारा हा ठळक तारा आहे. ह्या तारकाचे अरबी नाव अल-द-बरान असे आहे. बहुदा त्याच वरून या तार्‍याचे इंग्रजी नाव अल्डेबेरॉन (Aldeberon) असे पडले असावे.

रोहिणी तार्‍याचा समावेश वृषभ ह्या राशीच्या तारकासमुहात होतो. बहुतेक देशातील परंपरेत रोहिणीचा संबंध गाई? बैलांशी जोडला आहे. तर कथांमध्ये ह्या तार्‍यास कबुतराची देखिल उपमा देण्यात आली. आपल्या पूर्वजांना देखिल ह्या रोहिणी नक्षत्रातील व्ही ह्या तारकासमुहाचा आकार बैलगाडी प्रमाणे वाटला. प्राचीन साहित्यामध्ये याचा उल्लेख रोहिणी शकट असा आहे. शकट म्हणजे बैलगाडी किंवा पलंग.

ह्या तार्‍याबद्दल आपल्या प्राचीन साहित्यामध्ये एक कथा आढळते. ती म्हणजे प्रजापतीने प्रथम विराट नावाची स्त्री उत्पन्न केली. पण हिला यज्ञात योग्य तो मान न मिळाल्यामुळे ती उंच आकाशात गेली. उंच चढत जाणारी, आरोहण करणारी या अर्थाने बहुदा तिचे नाव रोहिणी पडले असावे.

दुसर्‍या एका कथेमध्ये असे आढळते की रोहिणी ही अत्यंत सौंदर्यवती होती व तिच्या ह्या सौंदर्यावर तिचा पिता प्रजापती लुब्ध झाला. कदाचित आपल्या पित्याच्या या घृणास्पद वर्तनामुळे ती आकाशात निघून गेली असावी.

आपल्या येथील पौराणिक साहित्यामध्ये चंद्र हा रोहिणीचा पती असल्याचे वर्णन आढळते. चंद्र-रोहिणी जोडपे सर्वमान्य असून या उभयतांचे पौराणिक साहित्यामधून भरपूर कौतुक केले आहे. एवढेच नव्हे तर नंतर या दिव्य जोडप्यास बुध हा पुत्र झाला.

 

आणखी एका कथेनुसार पुराणामध्ये प्रजापती राजास सत्तावीस कन्या होत्या. प्रजापतीने आपल्या सर्व कन्यांची लग्ने चंद्राबरोबर करून दिली. परंतु चंद्र रोहिणीच्या सौंदर्यावर इतका भाळला होता की आपल्या इतर पत्नींजवळ न राहता तो जास्त वेळ रोहिणीपाशीच राहू लागला. चंद्राच्या अशा वागण्याने प्रजापतीच्या इतर सव्वीस कन्यांनी आपली बहीण रोहिणी हिची तक्रार प्रजापती जवळ केली व प्रजापतीने देखिल रागाने चंद्राला तुला क्षय होईल असा शाप दिला. चंद्राची मनधरणी आणि रोहिणीचे चंद्रावरील प्रेम पाहून प्रजापतीने चंद्राला पंधरा दिवसाच्या क्षयानंतर पंधरा दिवसांच्या वृद्धीचा उःशाप दिला.

आज जरी आपणास माहीत असले की चंद्राच्या कला ह्या त्याच्या पृथ्वी भोवती फिरण्यामुळे व त्याच्यावर पडणार्‍या सूर्य किरणांमुळे होते. तरी या कथेनुसार चंद्रावर ही पाळी प्रजापतीच्या शापामुळे आली असे कळते. हजारो वर्षानंतर देखिल चंद्र आज पर्यंत हा 'क्षय आणि वृद्धी' चा शाप भोगतो आहे. रोहिणीवरील प्रेमामुळेच त्याला हा शाप मिळाला आणि तिच्यामुळेच उःशाप मिळाला.

आज देखिल आपणास ह्या दोन दिव्य प्रेमी युगुलाचे मिलन पाहावयाचे असल्यास कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दुसर्‍या रात्री अवकाश निरीक्षण केल्यास चंद्र-रोहिणीचे जोडपे पहाटेपर्यंत अवकाशात प्रवास करताना आढळतील.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी