पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

आर्द्रा :-

पटकन पाहताना हे नक्षत्र ओळखता येत नाही. त्याचे कारण त्याच्या आसपास इतर अनेक नक्षत्राची गर्दी असल्याने हे नक्षत्र सहज सापडत नाही. परंतु ते शोधणे तितकेसे कठीण देखिल नाही. मृग नक्षत्राच्या अगदी थोडेसे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास फिकट तार्‍यांची एक रेषा दिसेल. हे तारे फिकट असले तरी त्याच्यामध्ये एक तेजस्वी तारका आपणास आढळेल तिच आर्द्रा. ह्या नक्षत्रातील इतर सर्व तारका २ प्रतीच्या आहेत.

आर्द्रा या नावाचा अर्थ ओलावा. आज ज्याप्रमाणे मृग नक्षत्र सुरू झाल्यावर (सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश) पावसाळा सुरू होतो. त्याच प्रमाणे सुमारे तेराशे वर्षापूर्वी हे भाग्य आर्द्रा नक्षत्राच्या वाट्याला होते. म्हणजे सूर्याने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला की पावसाळा सुरू होई व सर्वत्र पाणी म्हणजे ओलावा आढळे. म्हणूनच ह्या नक्षत्राचे नाव आर्द्रा असे पडले असावे. काही ठिकाणी आदिवासी या आर्द्रेस 'आडदरा' असे म्हणतात. कारण उन्हाळ्यात उघडे पडलेले डोंगर व दर्‍या या आर्द्रेच्या पावसामुळे हिरव्यागार वनश्रीने झाकले जातात. हिरव्या पालवीने ते नजरे आड होतात म्हणून बहुदा त्यास 'आडदरा' असे म्हटले जाते.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी