पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

पुनर्वसू :-

आर्द्रा नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास दोन ठळक तारे आढळतील. त्यांना पुनर्वसू असे म्हणतात. ह्या नक्षत्राचे नाव जरी पुनर्वसू हे एकच असले तरी या नक्षत्रामध्ये दोन प्रमुख तारका आहेत. ह्या दोन तारकांपैकी पूर्वेकडील तार्‍यास प्लक्ष (पोलक्स) तर पश्चिमेकडील तार्‍यास कश (कॅस्टर) असे म्हणतात. आसपास जरी इतर अनेक तारे असले तरी हे नक्षत्र त्याच्या जोडीवरून लगेच ओळखता येते.

ह्या नक्षत्राचा समावेश बारा राशीपैकी मिथुन या राशीत होतो. ह्या नक्षत्रातील तारका म्हणजे मिथुन राशीतील स्त्री व पुरुष समजले जातात. वेगवेगळ्या देशातील संस्कृतीमध्ये देखिल ह्या दोन तार्‍यांना जुळेच मानण्यात आले आहे. म्हणजे जुळे भाऊ, जुळे प्राणी तर कुठे जुळे वृक्ष. आज देखिल आपल्या येथील काही आदिवासी जमातीत या दोन तारकांना मोराची जोडी मानण्यात येते.

ग्रीक पुराणात त्याच्याबद्दल एक कथा आढळते. ती अशी - देवाधिदेव 'ज्युपिटर' हा एकदा स्पार्टाच्या राज्याची राणी 'लिडा' वर भाळला. नंतर त्याने एका सुरेख पण संकटग्रस्त हंसाचे रूप घेतले व फसवून लिडाची सहानुभूती व सहवास मिळवला. पुढे लिडाने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. पोलक्स आणि कॅस्टर ही ती दोन जुळी मुले. पोलक्स आणि कॅस्टर दोघेही पुढे शूर योद्धे झाले.

 

दुसर्‍या एका ग्रीक कथेनुसार सुवर्ण लोकर (गोल्डन फ्लीक्स) प्राप्त करण्यासाठी 'अर्गो' नावाच्या युद्ध नौकेवरील वीरांसोबत कॅस्टर आणि पोलक्स यांनी सागर प्रवास केला. या प्रवासात अर्गोवरील नाविकांना त्यांनी वादळापासून वाचविले. कदाचित त्यामुळेच पूर्वी ते पाश्चात्य नाविकांचे ते आवडते तारे होते. ज्युपिटर या देवतेने त्यांचे शौर्य व परस्पर प्रेम पाहून त्यांना आकाशात तार्‍यांच्या रूपात स्थापित केले.

आपल्या येथील एका वैदिक कथेनुसार पुनर्वसू हे असुर आहेत. यज्ञाचे महत्त्व ओळखून यज्ञाद्वारे आपणही अतिशक्तीशाली बनण्यासाठी त्यांनी एका यज्ञाचे आयोजन केले. साहजिकच या यज्ञाला देवतांचा विरोध असणारच. यज्ञ सुरू होण्यापूर्वी इंद्र एका ब्राम्हणाच्या वेषात तेथे पोहचला. ब्राह्मणाच्या वेषातील इंद्राने आपल्या जवळील सोन्याच्या विटांचा यज्ञामध्ये वापर केल्यास यज्ञाचे फळ चांगले असेल असे सांगितले. ठरल्यानुसार ती सोन्याची वीट यज्ञ चयनात मांडण्यात आली व यज्ञ सुरू झाला. पण मध्येच ब्राम्हणाने वीट परत मागितली. आता या असुरांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला कारण जर वीट चयनातून काढावी तर यज्ञ मोडणार होता. येथे तो ब्राम्हण देखिल हट्टाला पेटला व कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच चयनातून ती वीट काढून घेतली व आकाशात भिरकावली. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे कोणताही विचार न करता ते दोन असुर आकाशात ती वीट पकडण्यासाठी पण ती वीट काही त्याच्या हाती आली नाही. ती वीट म्हणजे चित्रा नक्षत्र व तीच्या मागोमाग धावणारे दोन असुर म्हणजेच पुनर्वसू.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी