पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

पुष्य :-

२७ नक्षत्रांमध्ये सर्वात ठळक व ओळखता येणारे नक्षत्र म्हणजे मृग तर अंधुक व ओळखण्यास त्रासदायक नक्षत्र म्हणजे पुष्य. हे नक्षत्र ओळखण्यासाठी खरे सांगायचे तर शोधण्यासाठी इतर नक्षत्रांची मदत घ्यावी लागते.

पुनर्वसूच्या थोड्या अंतरावर एक टपोरी चांदणी दिसते मघा. मघा आणि पुनर्वसू या दोन नक्षत्रांमध्ये एक धूसरसा तारकासमूह दिसतो. या तारकासमुहातील सर्व तारका चार पेक्षा अधिक प्रतीच्या आहेत. सर्वसाधारणपणे साध्या डोळ्यांना सहा प्रतीच्या तारका दिसतात. तरी देखिल या नक्षत्रातील त्यातल्यात्यात काही ठळक चांदण्याकडे पाहिल्यास आपणाला त्या त्रिकोणी आकारात आढळतील. हा समूह म्हणजेच पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्रालाच वेदकाळी तिष्य असे नाव होते.

या नक्षत्रातील सर्व तारका अंधुक असल्यामुळे वेदकाळी क्रांतीवृत्तावर पुष्य नक्षत्रामध्ये गुरू आला असता तत्कालीन आर्यांनी गुरू हा ग्रह असल्याचे ओळखले. म्हणून गुरुचा जन्म पुष्य नक्षत्रामध्ये झाला असे वेदात म्हटले आहे. तेव्हापासून गुरू ग्रहाचा व पुष्य नक्षत्राचा संबंध अशा प्रकारे जोडला जातो की जर एखाद्या गुरुवारी गुरू ग्रह पुष्य नक्षत्रात आला तर त्यास 'गुरू पुष्य योग' मानण्यात येतो. 'गुरू पुष्य योग' हा आपल्या येथे शुभ मुहूर्त मानण्यात येतो. तसे पाहता गुरुला सूर्यास एक प्रदक्षिणा मारण्यास बारा वर्ष लागतात. म्हणजे बारा वर्षांनी गुरू पुष्य नक्षत्रात येतो. परंतु आज चंद्र पुष्य नक्षत्रात आला व त्या दिवशी जर गुरुवार असेल तरी तो गुरू पुष्यामृत योग मानला जातो. परंतु या मुहूर्तावर लग्न लागत नाहीत.

या नक्षत्राचा बारा राशीपैकी कर्क या राशीमध्ये समावेश होतो. रोमनांनी हा समूह मर्क्युरी देवतेचा मानला. खाल्डियन आणि ग्रीक लोकांची समजूत अशी की मानवी शरीरात निवास करण्यासाठी अंतराळातून आत्मे येतात. त्यांच्या मते पुष्य हे आत्म्यांचे पृथ्वीवर येण्याचे प्रवेशद्वार आहे. ग्रीकांना ह्याचा आकार खेकड्याप्रमाणे वाटला. त्याच्या कथेतही हा खेकडा आहे. हर्क्युलिस या महान योध्याचे एका पाण सापाशी युद्ध झाले. या सापाचे नाव हायड्रा. (आपण त्याला वासुकी म्हणतो. हा आकाशात पुष्य नक्षत्रा जवळ आहे.) या युद्धाच्यावेळी हर्क्युलिसचे लक्ष विचलित करण्यासाठी एका प्रचंड खेकड्याने त्याचा पाय धरला. अर्थात हर्क्युलिसने हायड्रा बरोबर या खेकड्यालाही ठार मारले. जुनो या ग्रीक देवतेने या खेकड्यालाही आकाशात स्थान दिले.

या नक्षत्रातील सर्व तारे जरी अंधुक असले तरी एखाद्या दुर्बिणीतून पाहिल्यास आपणास तेथे पुष्कळ तार्‍यांची गर्दी दिसेल.

 

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी