पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

मघा :-

ह्या नक्षत्राची चांदणी फारच प्रखर असल्यामुळे हे नक्षत्र लगेच ओळखता येते. पुष्य नक्षत्राच्या थोडेसे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास आकाशात एक टपोरी चांदणी दिसेल. व्यवस्थित निरीक्षण केल्यास त्या तारकासमुहाच्या चांदण्यांना धरून एक विळ्याची आकृती तयार होईल. ह्या विळ्याची मूठ म्हणजेच मघा नक्षत्राची चांदणी आहे. ह्या नक्षत्रास ओळखण्याची दुसरी खूण म्हणजे ह्या नक्षत्राचा आकार उलट्या प्रश्नचिह्नासारखा आहे. या नक्षत्रामध्ये साधारणात पाच-सहा तारे असल्यामुळे काही ठिकाणी ह्यास 'मघा पंचक' असेही म्हणतात.

या मघा तार्‍याचे रोमन नाव 'रेग्युलस' असे आहे. 'रेग्युलस' हे एका ग्रीक योध्याचे नाव सुमारे साडेचार हजार वर्षापूर्वी रोमन आणि काथेजिन्स एक महायुद्ध झाले. पुराणांत हे युद्ध प्युनिक वॉर या नावाने प्रसिद्ध आहे. या प्युनिक वॉरमध्ये रेग्युलस हा रोमन नौदलाचा प्रमुख होता. त्याच्या शौर्याबद्दल या मघाच्या तार्‍याला 'रेग्युलस' हे नाव देण्यात आले.

आपल्या येथे मघा नक्षत्र जरी पावसाचे नक्षत्र असले तरी या नक्षत्रातील पाऊस अविश्वसनीय मानला जातो. या नक्षत्रात पाऊस पडलाच तर भरपूर पडतो अथवा हे नक्षत्र कोरडेच जाते. तसे पाहता या नक्षत्रात पिकांना पाण्याची गरज असते. परंतु पाऊस बेभरंवशाचा असतो.

या तार्‍याचे स्थान आयनिक वृत्ताच्या अगदी जवळ असल्यामुळे दर महिन्यात चंद्र या तार्‍या अगदी जवळून जातो. माघ पौर्णिमेच्या दिवशी तर कधी कधी चंद्राच्या प्रकाशात या तार्‍याचे तेज देखिल कमी होते.

राशीमध्ये मघा नक्षत्राचा समावेश सिंह राशीत होतो.

आजदेखील आपल्या येथे गावांमध्ये शिमगा उत्सव साजरा केला जातो. मघा नक्षत्राचा तारा सिंह राशीमध्ये आहे. म्हणूनच बहुदा सिंह-मघा यावरून 'शिमगा' या नावाची उत्पत्ती झाली असावी.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी