पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

चित्रा :-

हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल तिचेच नाव चित्रा.

चित्रा नक्षत्राचा आणि पुनर्वसू नक्षत्राचा एकत्र असा एका कथेमध्ये उल्लेख आढळतो तो म्हणजे पुनर्वसू नक्षत्रातील दोन तारकांनी म्हणजेच त्या दोन राक्षसांनी स्वर्गप्राप्तीसाठी एकदा महायज्ञ केला त्यांचा यज्ञ मोडण्यासाठी इंद्राने ब्राम्हणाचे रूप घेतले व आपली सोन्याची वीट त्या यज्ञामध्ये मांडावी असा सल्ला दिला. परंतु यज्ञ सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात त्या ब्राम्हणाने आपली वीट परत मागितली व यज्ञ मोडण्यासाठी चयनातून ती वीट पटकन काढून घेतली व आकाशात भिरकावली. त्या विटेला पकडण्यासाठी राक्षसांनी देखिल आकाशात झेप घेतली. ते दोन राक्षस म्हणजे पुनर्वसू नक्षत्र आणि ती सोन्याची वीट म्हणजे चित्रा नक्षत्र होय.

चित्रा या नक्षत्राचा समावेश कन्या राशीमध्ये होतो. पाश्चात्य लोकांनी या तार्‍याचे नाव स्पायका ठेवले. स्पायका म्हणजे कणीस. त्या संदर्भात एक गोष्ट आढळते. उत्तर इजिप्शियनांच्या एका लोक कथेनुसार इसिस ही देवता टायफून नावाच्या दैत्यावर स्वार होऊन जात होती. तिच्या हातात मक्याचे कणीस होते. टायफूनच्या झंझावाती वेगामुळे तीच्या हातातील कणीस पडले. इसिस या देवतेला कन्या म्हणून स्थान मिळाले तर तिच्या हातून खाली पडलेल्या मक्याच्या कणसाचे दाणे विखरून आकाशगंगा तयार झाली. त्या आकाशगंगेतून लक्षावधी तारकांचे पीक फुलून आले.

चित्रा नक्षत्रास अरबी लोक 'कुत्र्याचे घर' म्हणतात. चिनी लोक यास शृगी म्हणजे शिंग असणारा असे म्हणतात. काही ठिकाणी आदिवासी लोक यास 'चित्ता' म्हणतात.

सूर्याचा भासमान मार्ग म्हणजेच आयनिकवृत्त आणि पृथ्वीचे विषुववृत्त समान नाही. सूर्याच्या उगवण्याच्या मार्गामध्ये दररोज थोडासा बदल होत असल्यामुळे ही वृत्ते वेगवेगळी आहेत. आयनिकवृत्त पृथ्वीच्या विषुववृत्ताला दोन ठिकाणी छेदते. त्या दोन ठिकाणांना आपण 'शरद संपात''वसंत संपात' बिंदू असे म्हणतो. हि दोन ठिकाणे देखिल कालांतराने बदलत असतात. परंतु त्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. सध्या ही चित्रा नक्षत्राची शरद संपात बिंदू जवळ आहे. म्हणजे सूर्य जेव्हा ह्या बिंदूवर असतो तेव्हा (२३ सप्टेंबर) दिवस व रात्र समान बारा-बारा तासांची असते.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी