पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

स्वाती :-

चित्रा नक्षत्रच्या थोडे उत्तरेकडे पाहिल्यास थोड्या अंतरावर आपणास अगदी चित्रा सारखीच दुसरी एक टपोरी चांदणी चमकताना आढळेल. चित्रा नंतर आपणास हीच अशी चांदणी आढळेल की जी चटकन नजरेत भरते. ही चांदणी म्हणजे स्वाती नक्षत्र. तिच्या तेजामुळे हे नक्षत्र ओळखण्यास सोपे जाते.

दुसर्‍या प्रकारे हे नक्षत्र शोधावयाचे असल्यास उत्तर ध्रृवाशेजारी असलेल्या सप्तर्षी या तारकासमुहातील शेवटच्या दोन तारकांना धरून पूर्वेकडे एक सरळ काल्पनिक रेषा काढल्यास ती बरोबर स्वाती नक्षत्रास येऊन मिळते.

पाश्चात्य लोक स्वातीस 'आर्कटूरस' असे म्हणतात व त्यांनी या नक्षत्राचा समावेश 'भूतप' या तारकासमुहात करतात. 'भूतप' या तारकासमुहाबद्दल ग्रीकमध्ये एक कथा आढळते. या कथेनुसार 'भूतप' हा ज्युपिटरचा पुत्र आहे. त्याच्या इतर भावांनी त्यास लुबाडले. नंतर जगभर भ्रमंती करून त्याने बैलाद्वारे ओढावयाचा नांगर शोधून काढला. या कथेनुसार हा नांगरधारी भूतप उत्तर ध्रृवाभोवतालचे आकाशाचे शेत युगानयुगे नांगरीत आहे. काही ठिकाणी या भूतप तारकासमुहाशेजारील सप्तर्षी या तारकांना नांगर असे म्हणतात.

काही ठिकाणी या तारकासमुहास शिकारी तर काही ठिकाणी 'ऍटलॉस'. तर काही ठिकाणी या स्वातीस 'जॉब स्टार' असे म्हणतात.

जवळपास सर्वच नक्षत्रांचे स्थान हे चंद्राच्या भ्रमण मार्गाच्या आसपास आहे. परंतु स्वाती हे एकच असे नक्षत्र आहे की ज्याचे स्थान चंद्राच्या भ्रमण मार्गापासून दूर आढळते. चंद्राच्या भ्रमण मार्गापासून स्वातीची चांदणी २० अंश दूर आहे. यावरून असा एक विचार मनामध्ये येतो, तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी ह्या इतक्या दूरच्या तार्‍यास नक्षत्रामध्ये का गणले? विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट गतिमान आहे आणि ग्रहाप्रमाणे तारे देखिल गतिमान आहेत. ग्रह जवळ असल्यामुळे त्याची गती व हालचाल लवकर लक्षात येते. परंतु ग्रहांच्या मानाने तारे पुष्कळ दूर असल्यामुळे त्याची हालचाल ओळखता येत नाही. हजारो वर्षाच्या कालावधी नंतर त्याच्या जागेमध्ये हा बदल आढळून येतो. बहुदा हेच स्वाती नक्षत्राबाबत घडले असावे. म्हणजेच फार पूर्वी या तार्‍याचे स्थान देखिल चंद्राच्या भ्रमण मार्गाजवळ असले पाहिजे.

स्वातीलाच काही ठिकाणी आदिवासी लोक 'स्वहाती' असेही म्हणतात. त्याबद्दलची त्यांची कल्पना अशी की स्वाती नक्षत्रातील पाऊस पडल्याने समुद्रातील शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. म्हणजे परमेश्वर स्वतःच्या हाताने स्वाती नक्षत्रातील पावसाचे थेंब मोती तयार करण्यासाठी शिंपल्यामध्ये भरतो.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी