पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

विशाखा :-

काही नक्षत्रे त्यांच्या चांदणीच्या प्रखर तेजाने पटकन ओळखता येतात तर काहींना मात्र शोधण्यासाठी थोडा त्रास होतो. विशाखा देखिल त्यापैकी एक. या नक्षत्रातील तारकांना प्रखर तेज जरी नसले तरी पुरेशा तेजामध्ये त्या अगदी पद्धतशीर मांडलेल्या आढळतात. स्वाती नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेस पाहिल्यास आपणास दोन समान तेजाच्या तारका थोड्या अंतराने अगदी समान रेषेत ठेवलेल्या आढळतात. तेच विशाखा नक्षत्र.

विशाखा नक्षत्राचा समावेश तूळ राशीमध्ये होतो. तूळ म्हणजे तराजू. तराजूचा वापरच समान मापनासाठी केला जातो व ज्या प्रमाणे तराजूच्या दोन्ही बाजू समान असतात त्याचप्रमाणे विशाखाच्या दोन्ही चांदण्या समान वाटतात.

विशाखाच्या पुढील नक्षत्राचे नाव अनुराधा म्हणजे राधेचे अनुकरण करणारी. बहुदा म्हणूनच काही ठिकाणी विशाखा नक्षत्रास राधा असेही म्हटले जाते.

ग्रीकमध्ये काही ठिकाणी या तारकासमुहास 'मोचिस' असे म्हटले जाते. ग्रीक पुराणानुसार मोचिसने तराजू व मापे यांचा शोध लावला.

एके काळी शरद संपात बिंदू हा विशाखा नक्षत्रात होता. याचा अर्थ असा की, सूर्य विशाखा नक्षत्रात आला की दिवस व रात्र समान होत असे. म्हणजे दिवस व रात्र समान बारा-बारा तासांची असे. अशा प्रकारे दिवस रात्रीची समान वाटणी करणारे असल्याने या तारकासमुहाची कल्पना करण्यात आली. पुढे भविष्यामध्ये हा शरद संपात बिंदू सरकत सरकत सध्या तो चित्रा नक्षत्राजवळ आहे.

वैशाख पौर्णिमेस अवकाश निरीक्षण केल्यास आपणास कधी कधी मनोहारी दृश्य पाहाव्यास मिळते. चंद्र पूर्वेस उगवताना या विशाखाच्या दोन चांदण्या चंद्राच्या दोन बाजूस दिसतात व मधोमध पौर्णिमेचा चंद्र तर कधी कधी या विशाखाच्या दोन चांदण्याच्या मधोमध चंद्राची अतिशय मोहक कोर पाहाव्यास मिळते.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी