पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

मूळ :-

वृश्चिक राशीची सुरुवात अनुराधा नक्षत्राने होते तर शेवट मूळ नक्षत्राने. वृश्चिक राशीमधील विंचवाची नांगी म्हणजे मूळ नक्षत्र. विंचवाची नांगी अर्ध गोलाकार असते त्याच प्रमाणे हे नक्षत्र देखिल अर्ध गोलाकार आकाराचाच आहे. दुसर्‍या प्रकारे ओळख सांगायची म्हणजे छत्रीची मूठ आणि इंग्रजीतील जे (J) आकारा प्रमाणे हे नक्षत्र दिसते. थोडक्यात काय तर एखादा नवखा अवकाश निरीक्षक देखिल हे नक्षत्र ओळखू शकतो.

सूर्य ज्या वेळेस मूळ नक्षत्रात येतो. त्या वेळेस साधारणपणे हिवाळा सुरू झालेला असतो.

विंचवाचे विष त्याच्या नांगीमध्ये असल्यामुळे काही ठिकाणी या नक्षत्रास विषाची उपमा देण्यात आली. म्हणून या नक्षत्रावरील जन्म काही ठिकाणी अशुभ मानला जातो.

मूळ नक्षत्राचे नाव तरे वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे लागेल. कारण आपल्या आकाशगंगेचे मूळही या मूळ नक्षत्रा जवळच आहे असा उल्लेख काही शास्त्रीय पुस्तकांमध्ये आढळतो. मूळ नक्षत्रामध्ये नऊ ते अकरा तारकांचा समावेश केला जातो.

काही ठिकाणी मूळ नक्षत्राचा समावेश धनु राशीमध्ये केलेला आढळतो.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी