पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

पूर्वाषाढा-उत्तराषाढा :-

पूर्वा फाल्गुनी - उत्तरा फाल्गुनी नक्षत्राप्रमाणे या नक्षत्राचा उच्चार देखिल सर्वसाधारणपणे एकत्रच केला जातो. हे नक्षत्र शोधण्यासाठी वृश्चिक राशीतील अनुराधा आणि मूळ नक्षत्रांना जोडून थोडे पुढे पूर्वेकडे एक रेषा काढली तर ती ज्या तारकासमुहामधून जाते तेच पूर्वाषाढा-उत्तराषाढा नक्षत्र. साधारणात पूर्वाषाढा नक्षत्रात चार आणि उत्तराषाढा नक्षत्रात चार असे दोन मोठे चौकोन मिळून एक मोठा तारकासमूह तयार होतो. हा मोठा तारकासमूह म्हणजेच धनु रास.

धनु रास म्हणजे पुरुष व पशू यांची मिश्र आकृती. पुढील तोंड पुरुषाचे व मागील शरीर घोड्याचे व या पुरुषाच्या हातामध्ये धनुष्य आहे. एका कल्पनेनुसार या धनुर्धारी पुरुषाने आपल्या बाणाचा नेम त्याच्या पुढील वृश्चिकावर (विंचूवर) रोखला आहे.

 

दुसर्‍या एका कथेनुसार यास 'वृषभारी' (बैलांना मारणारा) असेही म्हटले जाते. या कल्पनेचा संदर्भ पाहिल्यास आपणास निरीक्षणाद्वारे कळेल की आकाशात जेव्हा वृषभ रास मावळत असते. त्याच वेळेस धनुरास उगवत असते.

ग्रीक दंतकथेनुसार हा धनुर्धारी म्हणजे चिरोन नावाचा तिरंदाज आहे. याने सूर्यदेव अपोलो आणि हर्क्युलिस सारख्या महान योद्ध्यांना धनुर्विद्या शिकवली. तसेच हा केवळ धनुर्धारीच नव्हे तर संगीतकार आणि ज्योतिषशास्त्राचाही जाणकार होता.

ग्रीक दंतकथांतून प्रसिद्ध असलेली 'गोल्डन फ्लीस' अथवा सुवर्ण लोकर आणण्यासाठी 'अर्गो' नावाची जी नौका निघाली होती त्या नौकेवरील नाविकांना हा तारकासमूह वापरून दिशा कशा ओळखाव्यात हेही चिरोने शिकविले.

खगोलशास्त्रामध्ये धनुराशीच्या विभागास सर्वात समृद्ध भाग असे म्हणतात. कारण या भागात असंख्य तारकागुच्छ आणि तेजोमेघांची गर्दी आढळते. तसेच आपला सूर्य आणि धनुरास यांना जोडणारी रेषा काढलीतर ती आपल्या आकाशगंगेच्या केंद्रातून जाईल असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी