पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

शततारका :-

शततारका म्हणजे शंभर तारका. परंतु मुळात या नक्षत्रात जेमतेम आठ-दहाच्या आसपास तारका आहेत आणि त्या देखिल फार तेजस्वी नाहीत. साहजिकच त्यामुळे या नक्षत्रास शोधणे थोडे अवघडच.

धनिष्ठा नक्षत्रापासून थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास थोड्याशा अंधुक आठ दहा तारका आढळतात. शक्यतो अंधार्‍या रात्रीच त्या दिसतात.

आपल्या येथे या नक्षत्राचा समावेश कुंभ राशीमध्ये केला जातो. कुंभ म्हणजे पाण्याचा घडा. पाश्चिमात्यांनी देखिल यास 'ऍक्वेरिअस' हे नाव दिले. 'ऍक्वेरिअस' म्हणजे 'पाणी देणारा'.

फार पूर्वीपासून अनेक संस्कृतीमधून या नक्षत्राचा संबंध पाण्याशी जोडण्यात आला आहे. बहुदा त्यामागचे कारण असे की ज्याप्रमाणे आपल्या येथे मृग नक्षत्र हे पावसाचे नक्षत्र मानले जाते त्याप्रमाणे पूर्वी सूर्य या कुंभ ('ऍक्वेरिअस') राशीमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये आला की बॅबेलोनीया इत्यादी ठिकाणी पाऊस पडत असे व नाईल नदीला पूर येत असे. ग्रीकमध्ये यास ड्युकालिऑन (पाणी ओतणारा) असे म्हटले जाते.

वैदिक काळापासून आपल्या येथे या शततारकेचा उल्लेख आढळतो. वैदिक काळात त्यांना शततारका ऐवजी शतभिषक असे म्हणत असत. या नावाचा काहीसा अर्थ शंभर वर्ष आयुष्य देणारा असा होतो. या नक्षत्राचा काळ हा विशिष्ट औषधी वनस्पतीचा असावा किंवा या नक्षत्रावर अनेक वैद्यांचा जन्म झाल्यामुळे आपल्या पूर्वजांचा शततारकेबद्दल तसा समज झाला असावा? काही सांगता येत नाही.

यजुर्वेदात या शततारकेच्या नक्षत्राकडे आपल्याला आयुष्य व आरोग्य देणारी औषधे मागितलेली आहे.

बहुदा शततारका हे नाव ठेवण्यामागे अशी काहीशी कारणे आढळतात.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी