पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

नक्षत्र

 

पूर्वाभाद्रपदा-उत्तराभाद्रपदा :-

काही नक्षत्रे जोडीने आढळतात. कारण या नक्षत्रांच्या जोडीमुळे एखादा वेगळा तारकासमूह तयार होत असावा. याचे एक उदाहरण म्हणजे पूर्वाभाद्रपदा-उत्तराभाद्रपदा. या नक्षत्राचा उल्लेखसुद्धा एकत्रच करण्यात येतो.

धनिष्ठा नक्षत्राच्या मदतीने जर थोडे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास चार ठळक तारकांचा एक मोठा चौकोन आढळेल. या चारही तारका तेजस्वी असल्याने हा चौकोन चटकन ओळखण्यात येतो. या चौकोनातील पुढील दोन तारका म्हणजे पूर्वाभाद्रपदा नक्षत्र तर मागील दोन तारका म्हणजे उत्तराभाद्रपदा.

आपल्या येथे वेदकाळापासून या नक्षत्रांचा उल्लेख आढळतो. त्या काळात त्यांना 'पौष्ठपदा' हे नाव होते. रामायण काळापर्यंत पौष्ठपदा हेच नाव प्रचलित होते. पाश्चात्यांनी या तारकासमुहास 'पेगॉसस' हेच नाव दिले आहे. त्याबद्दलची एक कथा ग्रीक पुराणात आढळते.

मेड्युसा राक्षसीचा पर्स्युअसने (आपण या तारकासमुहास ययाती म्हणतो.) वध केल्यानंतर त्या मेड्युसाच्या रक्तापासून एक घोडा निर्माण झाला. त्याच घोड्याचे नाव पेगॉसस. या पेगॉससवर बसूनच पर्स्युअस गगनविहार करीत नंतर हेलिकॉन पर्वतावर उतरला. याच पर्वतावर एका खडकाला बांधून ठेवलेली अँडोमिडा (आपण या तारकासमुहास देवयानी म्हणतो.) त्याला भेटली व पर्स्युअसने तिची सुटका केली. सध्या आकाशात पर्स्युअस (ययाती) हा तारकासमूह पेगॉसस पासून लांब असला तरी अँडोमिडा (देवयानी) मात्र याला लागूनच आहे.

 

आणखी एका ग्रीक कथेनुसार वेलेरोफॉन याच्यावर लायसिया येथील कायमिरा राक्षसाच्या वधाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. नेप्च्यूनने वेलेरोफॉनला लायसिया येथे जाण्या करीता हा घोडा दिला. कायमिराचा वध करून परत येताना या घोड्यावरून वेलेरोफॉन खाली पडला. घोडा मात्र उंच आकाशात उडत गेला. ज्युपिटर देवतेने त्याला नक्षत्र मंडळात स्थान दिले.

 
संदर्भ - नक्षत्र विहार (श्री. एल.के.कुलकर्णी)
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी