पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

या महिन्यातील ग्रहस्थिती - फेब्रूवारी २०१९

 
बुध
महिन्याच्या सुरुवातीला सूर्याच्या जवळ असलेला बुध ग्रह महिना अखेर पर्यंत आपणास सूर्यापासून बराच दूर गेलेला दिसेल. दिनांक २७ फेब्रूवारी २०१९ रोजी तो सूर्यापासून सर्वात दूर असेल यावेळी आकाश निरभ्र असल्यास आपणास बुध ग्रह दिसेल. आपणास तो संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर सूर्य मावळल्या मीन तारकासमूहातील मीन पंचाकाशेजारी दिसेल. यावेळी तो सूर्यापासून साधारण १८ अंश इतक्या दूर असेल. दिनांक १९ फेब्रूवारी २०१९ रोजी बुध आणि नेपच्यून हे दोन ग्रह अर्ध्या अंशामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले दिसतील.
   
शुक्र
या महिन्यात सुरुवाती पासूनच सूर्यापासून बराच दूर असलेला शुक्र ग्रह या महिन्यात हळू हळू सूर्याच्या दिशेने सरकताना दिसेल. तरीही साधारण ४५ अंश इतक्या दूर असल्याने आपणास तो पहाटे सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर धनु तारकासमूहामध्ये आढळेल. त्याच्या तेजस्वितेमुळे कुणाच्याही मदतीशिवाय आपण शुक्र ग्रह सहज ओळखू शकता. दिनांक १ फेब्रुवारी रोजी चंद्रकोरीच्या थोडासा वर आपणास शुक्र ग्रह आढळेल. दिनांक १८ फेब्रूवारी २०१९ रोजी  शुक्र आणि शनी हे दोन ग्रह एक अंशामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले दिसतील.
   
मंगळ
या महिन्यात सूर्यास्तानंतर डोक्यावरील आकाशात मंगळ ग्रह दिसेल. आपणास तो मेष तारकासमूहातील तारकांच्या शेजारी आढळेल. त्याच्या लाल रंगामुळे आपण त्याला सहज ओळखू शकता. मध्यरात्री पर्यंत आपणस मंगळ ग्रह पश्चिम क्षितिजावर मावळताना दिसेल.  दिनांक १० फेब्रुवारी रोजी चंद्रकोरीच्या थोडासा उजवीकडे आपणास मंगळ ग्रह आढळेल. दिनांक १३ फेब्रूवारी २०१९ रोजी मंगळ आणि युरेनस हे दोन ग्रह एक अंशामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले दिसतील.
   
गुरु
या महिन्यात गुरु मध्यरात्री (वेळ ३ वा.) पूर्व क्षितिजावर उगवताना आढळेल. आपणास तो वृश्चिक तारकासमूहाशेजारी आढळेल.  दिनांक २८-१९ फेब्रुवारी रोजी चंद्रकोरीच्या थोडासा वर आणि खाली आपणास  गुरु ग्रह आढळेल.
   
शनी
महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याच्या जवळ असलेला शनी ग्रह महिना अखेर पर्यंत सूर्यापासून दूर जाताना दिसेल. आपणास तो सूर्योदयापूर्वी पूर्वी क्षितिजावर धनु तारकासमूहामध्ये आढळेल. दिनांक २ फेब्रुवारी रोजी चंद्रकोरीच्या अगदी जवळ (दोन अंशावर) आपणास शनी ग्रह आढळेल. 
   
युरेनस
या महिन्यात सूर्यास्तानंतर डोक्यावरील आकाशात युरेनस ग्रह असेल. नुसत्या डोळ्यांनी हा ग्रह पाहणे शक्य नाही, या ग्रहाला पाहण्यासाठी मोठ्या आकाराची शक्तिशाली दुर्बीण वापराने आवश्यकआहे. आपणास तो मेष आणि मीन तारकासमूहामध्ये आढळेल. या महिन्यात या ग्रहाला पाहण्याचा एकमेव पर्याय म्हणजे मंगळ आणि युरेनस या दोन ग्रहांची युती. दिनांक १३ फेब्रूवारी २०१९ रोजी मंगळ आणि युरेनस हे दोन ग्रह एक अंशामध्ये एकमेकांच्या जवळ आलेले दिसतील.
   
नेपच्युन
या महिन्यात आधीच पश्चिम क्षितिजावर असलेला नेपच्यून ग्रह हळूहळू सूर्याच्या दिशेने सरकत असल्याने नंतर सूर्यप्रकाशात लुप्त झाल्याने आपणास नेपच्यून ग्रह या महिन्यात दिसणार नाही.
 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी