पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

पृथ्वीची तिसरी गती

 

पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ती स्वतःभोवती फिरता-फिरता सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याने एक दिवस पूर्ण होतो तर सूर्याभोवती एक फेरी पूर्ण केल्याने एक वर्ष होते अथवा एका वर्षामध्ये पृथ्वी सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करते. प्रत्यक्षात या दोन गती व्यतिरिक्त पृथ्वी अजूनही इतर गतीमध्ये फिरते पण त्याची माहिती शक्यतो कमी लोकांना असते.

पृथ्वी स्वतःभोवती तीच्या अक्षाभोवती फिरते. खालील चित्रामध्ये पृथ्वीचा अक्ष दाखविलेला आहे.

पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो थोडासा म्हणजेच २३.५० अंशांनी कललेला आहे. म्हणजेच पृथ्वी सरळ उभी नसून ती थोडीशी तिरकी आहे. हा पृथ्वीचा कललेल्या अक्ष देखिल स्थिर नसून २६,००० वर्षांमध्ये तो गोल फिरतो.

पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे.
 

खालील चित्रामध्ये पृथ्वीच्या अक्षाची फेरी दाखविली आहे. तीला 'परांचन गती' (इंग्रजीमध्ये तिला Precession Motion)  असे म्हणतात.

 

असे असले तरी प्रत्यक्षात पृथ्वीच्या तीन नसून इतरही गती आहेत आणि चौथी गती म्हणजे सूर्यमालेमध्ये सूर्याबरोबर फिरता-फिरता सूर्यमालेसोबत आकाशगंगेमध्ये पुढे सरकत आकाशगंगेमध्ये फेरी पूर्ण करणे.   पृथ्वीची पाचवी गती म्हणजे पृथ्वीचा अक्ष देखिल गोल फिरतो म्हणजेच हजारो वर्षांच्या काळामध्ये पृथ्वीचा उत्तर अक्ष दक्षिणेला तर दक्षिण अक्ष उत्तरेला असा फिरतो.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी