पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

विश्वाची व्याप्ती

 

विश्व किती मोठे आहे? हे कोडे अजूनतरी मानवाला उलगडलेले नाही, म्हणूनच विश्वाची व्याप्ती सांगताना अनंत हा शब्द जोडला जातो. ज्याला अंत नाही असा अनंत. परंतू निसर्ग नियमांमध्ये प्रत्येकाला मर्यादा आहेत, कोणतीही वस्तू आपली मर्यादा ओलांडू शकत नाही. मग हाच नियम बहूदा विश्वाला देखिल लागू होत असावा.

एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मानव आपल्या डोळ्यांनी विश्वातील अंतराळामध्ये पसरलेल्या गोष्टी पाहू शकतो. तर दुर्बिणीच्या मदतीने मानवाने आपल्या मर्यादा वाढविल्या आहेत व तो त्यापुढील अधिक गोष्टी पाहत आहे. अशावेळेस असे दिसून येते की मानवाने त्याच्या मर्यादा कितीही वाढविल्या तरी विश्व हे अजूनही पूढे अनंत असल्याचे दिसून येते.

मूळात मर्यादेची संकल्पनाच बदलून ती विश्वासाठी अमर्याद असल्याचे भासते.

विश्व मोजण्यासाठी आपल्याला प्रथम आपल्या आकाराचा देखिल विचार करायला हवा. जसे सूईच्या टोकावर लाखोंच्या संख्येने राहू शकतील इतक्या सुक्ष्म आकाराच्या 'अमिबाला'  पृथ्वीचा व्यास कसा मोजता येईल? जर हेच समिकरण विश्वासाठी घेतल्यास बहूदा आपला आकार अमिबापेक्षाही कितीतरी पटीने लहान होईल. अशावेळेस विश्वाचा आकार आपल्यासाठी अनंतच मानायला हवा.

शास्त्रज्ञांच्या मते विश्वाची व्याप्ती सतत वाढता आहे. म्हणजेच स्थिर भासणारे विश्व प्रसरण पावत आहे हा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी लावला आहे.  याचाच अर्थ, मुळात अमर्याद असणार्‍या विश्वाची व्याप्ती जर सध्या आपण मोजू शकत नाही तर भविष्यामध्ये तर हे कधिही शक्य होणार नाही. साहाजिकच आकारमानुसार एखाद्या विराट गोष्टीमध्ये होणार्‍या बदलाचा वेगही प्रचंड असतो.

मग असा प्रश्न निर्माण होतो कि जर शक्य होणार नसेल तर मग हा व्याप्ती मोजण्याचा व्यर्थ प्रयत्न तरी का करावा?

या प्रश्नाचे उत्तर तितकेसे कठीण नाही, शक्य नसलेल्या गोष्टी शोधतानाच इतर माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा होतो. विश्वाची व्याप्ती मोजण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमूळे शास्त्रज्ञांना विश्वातील इतर अनेक गोष्टींची माहिती मिळाली आहे.  न जाणो भविष्यामध्ये ह्याच इतर महत्त्वाच्या माहितीद्वारे मानवाला निदान विश्वाच्या निर्मितीचे गुढ शोधता येईल.

एका शोधासाठी केलेले प्रयत्न भविष्यामध्ये कितीतरी प्रश्नांची उत्तरे देईल हे नक्की.

- सचिन पिळणकर

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी