पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

ब्लु मून - निळा चंद्र

 

'ब्लु मून' म्हणजेच 'निळा चंद्र'. म्हणजे रोज दिसणारा करड्या रंगाचा चंद्र खरेच निळा दिसणार?

मुळीच नाही. त्या दिवशी देखील चंद्र जसा नेहमी दिसतो तसाच निळा दिसणार.

मग ही 'ब्लु मून' काय भानगड आहे?

साधारण एका महिन्यात जेव्हा दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या दुसर्‍या पौर्णिमेस 'ब्लु मून' अशा वेगळ्या नावाने संबोधतात.

आपल्या इथे 'हा कधी तरी अमावास्या-पौर्णिमेला उगवतो' अशी एक म्हण आहे म्हणजेच क्वचित घडणार्‍या गोष्टींसाठी आपण ही म्हण वापरतो. तशीच परदेशात 'वन्स इन अ ब्लु मून' - 'पुन्हा एकदा निळ्या चंद्राच्या वेळी' अशी म्हण आहे. दुर्मिळ अथवा क्वचित घडणार्‍या गोष्टींसाठी ही म्हण वापरली जाते. एकाच महिन्यात दोन पौर्णिमा किंवा अमावस्या ही देखिल अशीच एक दुर्मिळ घटना आहे.

ज्या वेळेस एका महिन्यामध्ये दोन पौर्णिमा येतात तेव्हा त्या दुसर्‍या पौर्णिमेस 'ब्लु मून' ( निळा चंद्र ) तर एका महिन्यामध्ये जेव्हा दोन अमावस्या आल्यास त्यास 'ब्लॅक मून' ( काळा चंद्र ) असे म्हणतात.

मग हा निळा चंद्र पाहायचा तरी कसा?

आपणास निळा चंद्र पाहायचा असेल तर त्यावर एकच उपाय म्हणजे निळ्या काचेमधून चंद्र पाहायचा आणि जर तुम्हाला हिरवा अथवा लाल चंद्र पाहायचा असेल तर मग आपणास हव्या त्या रंगाची काच वापरून चंद्र पाहायचा.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी