पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

वक्रगती म्हणजे काय?

 

तारे स्थिर असतात व ग्रह आपली जागा बदलतात. खरेतर तारे पण आपली जागा बदलत असतात पण ते फार दूर असल्याने त्यांची बदललेली जागा साधारण हजार वर्षांमध्ये लक्षात येते. त्यामानाने ग्रह पृथ्वीच्या फारच जवळ असल्याने त्यांची बदललेली जागा एका महिन्यामध्ये पण लक्षात येते.

सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या विरुद्ध दिशेत फिरतात. म्हणजेच पृथ्वीवरून पाहताना आपणास ते पश्चिम ते पूर्व असे फिरताना दिसतात.

कुठल्याही वस्तूची बदललेली जागा ही नेहमी त्या वस्तूच्या मागे असलेल्या गोष्टीवरून लक्षात येते. ग्रहांच्या बाबतीत जेव्हा ग्रह जागा बदलतात तेव्हा त्यांच्या मागील तार्‍यांच्या मदतीने त्यांची बदललेली जागा कळते. ठराविक काळाने सर्व ग्रह पश्चिम ते पूर्व अशा मार्गाने पुढे सरकलेले दिसतात. अशा वेळेस उलट मार्गाने जाताना दिसणार्‍या त्या ग्रहाच्या गतीस वक्रगती म्हणजेच इंग्रजीमध्ये 'रेट्रोग्रेड मोशन' असे म्हणतात.

सूर्याभोवती भ्रमण करताना पृथ्वीदेखील दररोज आपली जागा बदलत पुढे जात असते. प्रत्येक ग्रहाच्या परिभ्रमणाचा वेग निरनिराळा आहे. सूर्यमालेतील पृथ्वी नंतरच्या ( मंगळ, गुरू, शनी इ. ) ग्रहांचा सूर्य प्रदक्षिणेचा वेग पृथ्वीचा वेग कमी आहे. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग त्यांच्या पेक्षा जास्त असल्याने, पृथ्वी तीच्या गोलाकार कक्षेमध्ये फिरताना एखादा ग्रह पुढे जाताना दिसत असेल तर काही काळाने त्या ग्रहाच्या समांतर रेषेमध्ये आल्यावर तो ग्रह व पृथ्वी एकत्र पुढे जात असल्याचे भासते तर काही काळाने पृथ्वी आपल्या गतीने पुढे गेल्याने तो ग्रह पुढे जाण्याऐवजी मागे जाताना दिसतो. जरी तो ग्रह पुढे जात असला तरी पृथ्वीचा वेग जस्त असल्याने तो मागे राहून मागे-मागेच जाताना दिसतो. अशा वेळेस ती त्या ग्रहाची वक्रगती असे म्हटले जाते. पुढे आणखी काही काळाने पृथ्वी तीच्या गोलाकार भ्रमण कक्षेमध्ये फिरल्याने तो ग्रह परत व्यवस्थित पुढे जाताना दिसतो.

पृथ्वी मागे असताना पुढे, समांतर रेषेमध्ये असताना स्थिर, पृथ्वी पुढे गेल्याने वक्रगती व पृथ्वी वळल्याने परत सरळ असे तीन प्रकार पाहायला मिळतात. वक्रगती सर्व ग्रहांच्या बाबतीत पाहायला मिळते.

वरील ऍनिमेशन वरून ग्रह जरी व्यवस्थित भ्रमण करीत असले तरी पृथ्वीवरून पाहिल्यास त्यांची वक्रगती कशी दिसते हे आपल्या लक्षात येईल.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी