पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

पंचांग म्हणजे काय?

 

रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या ग्रहांचे वेळ व तारखेनुसार राशी व नक्षत्रातील स्थान सांगणारे वेळापत्रक म्हणजे पंचांग. पंचांगामध्ये वार, तिथी, नक्षत्र, योग आणि करण अशी पाच महत्त्वाची अंगे असतात.

 

 

पंचांगाचे पहिले अंग वार - मध्ये रोजचा वार दिलेला असतो. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे हे सात वार क्रमाने येतात.

पंचांगाचे दुसरे अंग तिथी - म्हणजेच एखाद्या दिवशी सूर्योदयाच्यावेळी चंद्राची कोणती कला ( म्हणजेच तिथी ) चालू आहे.

पंचांगाचे तिसरे अंग नक्षत्र - यामध्ये सूर्य आणि चंद्राच्या मार्गावर २७ भागांमध्ये विभागलेले समूह म्हणजेच नक्षत्रामध्ये चंद्राचा मुक्काम किती वाजेपर्यंत आहे ते तास व मिनिटांमध्ये दाखविलेले असते.

पंचांगाचे चौथे अंग योग - म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या गतीची बेरीज. सर्वसाधारण सूर्याची रोजची गती ५९ कला ८ विकला एवढी असते, तर चंद्राची सर्वसाधारणपणे ७९० कला ३५ विकला एवढी असते, म्हणजेच दोन्हींची बेरीज ८४९ कला ४३ विकला एवढी होते. त्यापैकी ८०० कला बेरीज झाली की एक योग झाला, असे समजतात.

पंचांगाचे पाचवे अंग करण - म्हणजे तिथीचा अर्धा भाग, सूर्य-चंद्रामध्ये १२ किंवा १२ ची पट अंतर म्हणजे अलग अलग तिथी ज्याप्रमाणे निर्माण होते, त्याप्रमाणे सूर्य-चंद्रामध्ये ६ अंश किंवा ६ ची पट अंतर पडले म्हणजे अलग अलग करणे निर्माण होतात. करणे एकंदर ११ आहेत.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी