पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

तारकासमुहांचे आकार

 

रात्रीच्या अवकाशामध्ये आपणास अनेक तारे दिसतात. ह्या विखुरलेल्या तार्‍यांना नंतर समूहांमध्ये विभागण्यात आले. ह्या समूहांना त्यांच्या काल्पनिक आकृतीनुसार नावे देण्यात आली. समूहामध्ये असलेले तारे जवळ जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र एकमेकांपासून पुष्कळ लांब आहेत.

पृथ्वीवरून तार्‍यांना पाहताना आपण त्यांना एका सरळ रेषेमध्ये पाहत असतो त्यामुळे अवकाशातील एका विशिष्ट अंतराच्या प्रतलामध्ये आपणास ते एका समान अंतरावर समूहाने असल्याचा भास होतो.

वरील चित्रावरून आपणास कळेल की मृग तारकासमुहातील तारे एकत्र जरी वाटत असले तरी ते ५० ते २२५ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत.

चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे समोरून पाहिल्यास पुढे-मागे असलेले हे तारे एका सरळ प्रतलामध्ये आढळतात व त्यावरून ते सर्व तारे एकाच समूहातील असल्याचा भास होतो.

टीप :- फक्त विषय समजण्यापुरते वर मृग तारकासमुहातील तारे ५० ते २२५ प्रकाशवर्ष एवढ्या अंतरामध्ये विखुरलेले आहेत असे म्हटले आहे. प्रत्यक्षात मृग तारकासमुहातील तारे २४३ ते १३५९ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी