पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

सूर्यावरील काळे डाग

 

सूर्यावरील काळे डाग त्याच्या पृष्ठभागावर तयार होतात. ह्या काळ्या डागांच्या जागेवरील तापमान बाजूच्या तापमानाच्या मानाने कमी असल्याने इथे काळे डाग दिसतात.

सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी (५८०० केल्विन) ६००० अंश सेल्सिअस एवढे. त्या मानाने काळ्या डागांच्या जागेचे तापमान जवळपास ४००० अंश सेल्सिअस इतके असते, तुलनेत बाजूच्या जागेच्या तापमानापेक्षा ह्या जागेतील तापमान कमी असल्याने परिणामी तेथे काळे डाग दिसून येतात.

सूर्यावरील इतर भागावरील प्रकाशाच्या मानाने त्या भागातील प्रकाश कमी जरी असला तरी एका छोट्या काळ्या डागाएवढा गोल जर रात्रीच्या आकाशात ठेवला तरी त्या प्रकाशामध्ये तो पूर्ण चंद्रबिंबापेक्षा तेजस्वी दिसेल.

ह्या काळ्या डागाच्या मध्यभागी गडद काळा रंग असतो ज्यास अंब्रा (umbra) असे म्हणतात तर काळ्या डागांच्या बाजूचा भाग फिकट काळसर असतो ज्यास पेनुंब्रा (penumbra) असे म्हणतात. सूर्यावरील चुंबकिय क्षेत्रामुळे काही वेळेस त्याच्या पृष्ठभागावरील ऊर्जा बाहेर पडू शकत नाही व परिणामी असे काळे डाग निर्माण होतात. सूर्यावरील पृष्ठभागावरून फेकल्या जाणार्‍या ऊर्जेस 'सौरवात' असे म्हणतात. हे सौरवात अवकाशात इतरत्र फेकले जाऊन त्यापासून 'सौरवारे' निर्माण होतात.

हे काळे डाग नेहमी बदलत असतात, तर काही वेळेस जुने डाग नष्ट होऊन नवीन डाग निर्माण होतात. साधारण ११ वर्षाच्या काळामध्ये ह्या काळ्या डागांचे एक चक्र पूर्ण होते. ह्या काळामध्ये काळ्या डागांची संख्या कमी होऊन पुन्हा जास्त होते.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी