पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

समुद्राला भरती व ओहोटी का येते?

 

पृथ्वी आणि चंद्र यांच्या एकमेकांच्या होणार्‍या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळेच समुद्राला भरती व ओहोटी का येते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीचा तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने चंद्राचा भाग खेचला जातो. चंद्राचा पृथ्वीच्या जमीनीवर होणारा प्रभाव फारच कमी असल्याने तो जाणवत नाही. परंतू पृथ्वीवरील पाण्यावर म्हणजेच समुद्रावर हा प्रभाव प्रकर्षाने दिसून येतो.

पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी २४ तास लागतात म्हणजेच १२ तासांच्या अंतराने चंद्र पृथ्वीच्या दोन विरुद्ध बाजूस असतो. दुसरी गोष्ट अशी की चंद्र दररोज ५० मिनिटे उशिरा उगवतो म्हणजेच जवळपास १२.२५ तासांच्या अंतराने तो दिवसभरामध्ये पृथ्वीच्या दोन विरुद्ध बाजूस असतो. अशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरताना अथवा पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पृथ्वीचा जो भाग चंद्राच्या दिशेने असतो त्या आणि त्याच्या विरुद्ध बाजूस चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती आलेली असते.

पौर्णिमा आणि अमावास्येच्या वेळी सूर्य आणि चंद्र हे पृथ्वीसापेक्ष एकाच रेषेमध्ये येतात, यावेळेस सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा जास्त प्रभाव पृथ्वीवर पडतो आणि समुद्राला मोठी भरती येते, यालाच 'उधाणाची भरती' असे देखिल म्हणतात.

सूर्य आणि चंद्र या दोघांच्या गुरुत्वाकर्षणाचा परीणाम जरी पृथ्वीवर होत असला तरी चंद्राच्या मानाने सूर्याचे पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण फार कमी आहे, कारण सूर्याच्या मानाने चंद्राचे वस्तुमान आणि गुरुत्वाकर्षण बळ कमी असले तरी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने त्याचा पृथ्वीवर परीणाम जास्त होतो.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी