पहिले पान हा महिना सुरुवात ओळख सूर्यमालेची लेख आणि कथा इतर माहिती अंतराळ खगोलीय गोष्टी भारतीय खगोलशास्त्रज्ञ भारतीय खगोलशास्त्र प्रश्नोत्तरे अधिक माहिती निरीक्षणे खरेदी करा डाऊनलोड आमची ओळख
 
 
 

मोफत सभासदत्व

 

अवकाशवेध.कॉमचे मोफत सभासद होण्यासाठी इथे क्लिक करा.

 

मित्र-मैत्रिणींना कळवा

\

अवकाशवेध.कॉम बद्दल आपल्या
मित्र-मैत्रिणींना सांगा.

 

पहिल्या पानावर जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

सूर्यमालेचे आकाशगंगेतील स्थान

 

सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. पण त्यापैकी बहुतांश तारे आपण पाहू शकत नाही. रात्रीच्या अवकाशामध्ये दिसणार्‍या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या आकाशगंगेतील आहेत.

साधारण १, ००, ००० ( १ लाख ) प्रकाशवर्षे व्यास असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या केंद्रापासून जवळपास २६, ००० प्रकाशवर्षे आपली सूर्यमाला आकाशगंगे भोवती फिरते आहे. खरेतर सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला सूर्य आपल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाच्या बळावर त्याच्या भोवती फिरणार्‍या ग्रहमालेला घेऊन प्रती सेकंद २७० कि. मी. या वेगाने २० कोटी वर्षांमध्ये आकाशगंगेभोवती एक फेरी पूर्ण करतो. आतापर्यंत आपल्या सूर्याने आकाशगंगेच्या २० फेर्‍या पूर्ण केल्या आहेत.

आकाशगंगेच्या प्रतलामध्ये सूर्यमाला ६५ अंश कललेली असल्याने आपणास रात्रीच्या आकाशामध्ये आकाशगंगेचा पट्टा पाहायला मिळतो.

 
अक्षरांचा आकार वाढवा  /  अक्षरांचा आकार पुर्ववत करा

वर जाण्यासाठी

अवकाशवेध.कॉम वरील माहिती संबंधी