जानेवारी २०१८

दिनांक ७ जानेवारी २०१८ रोजी मंगळ आणि गुरु या दोन ग्रहांची युती पाहता येईल. यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेकांच्या अर्ध्या अंशापेक्षाही कमी एवढ्या जवळ येतील.
   
दिनांक ११ जानेवारी २०१८ रोजी मंगळ, गुरु आणि चंद्र हे एकत्र दिसतील.
   
दिनांक १३ जानेवारी २०१८ रोजी शनी आणि मंगळ या दोन ग्रहांची युती पाहता येईल. यावेळी हे दोन्ही ग्रह १ अंशापेक्षाही कमी अंतरात एकमेकांच्या जवळ येतील.