या महिन्यात आकाशातील ग्रहस्थिती

व्हिडीओ बघण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.

ग्रहस्थिती – एप्रिल २०२४

बुध ग्रह – महिन्याच्या सुरुवातीपासूनच बुध ग्रह सूर्याच्या अधिक जवळ जाताना दिसेल. तर महिना अखेर पर्यंत बुध ग्रह सूर्यापासून साधारण २३ अंश इतक्या दूर जाईल. यावेळी आपण त्याला पाहू शकता. आपणास बुध ग्रह पहाटे सुर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर मीन तारकासमुहामध्ये शुक्र आणि मंगळ या दोन ग्रहांच्या मध्ये आढळेल.

शुक्र ग्रह – सूर्याच्या आधीच जवळ असलेला शुक्र ग्रह सूर्याच्या अधिकच जवळ गेल्याने सूर्यप्रकाशात लुप्त झाल्याने या महिन्यात दिसणार नाही.

मंगळ ग्रह – हा महिनाभर मंगळ ग्रह आपणास पहाटे सुर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर कुंभ आणि मीन या दोन तारकासमुहामध्ये सरकताना दिसेल. त्याच्या लाल रंगामुळे जरी तो ओळखणे शक्य असले तरी दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी मंगळ आणि शनी या दोन ग्रहांची युती पाहायला मिळेल. यावेळी हे दोन ग्रह एकमेकांच्या साधारण अर्धा अंश इतक्या जवळ येतील. दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजी मंगळ – शनी आणि चंद्र या तिघांची युती पहायला मिळेल.

गुरु ग्रह – या महिन्यात गुरु ग्रह सूर्यास्तानंतर आपल्याला पश्चिम आकाशात बराच वर दिसेल. आजूबाजूला इतर कोणताही तेजस्वी तारा अथवा ग्रह नसल्याने आपण पश्चिम क्षितिजावर एकमेव चमकणारा गुरु ग्रह सहज ओळखाल. आपल्याला तो मेष तारकासमुहामध्ये आढळेल. दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी चंद्रकोरीच्या थोड्या वर अंतरावर आपल्याला गुरु ग्रह आढळेल. महिनाअखेर पर्यंत तो सूर्याच्या अधिक जवळ जात सूर्यप्रकाशात लुप्त होईल.

शनी ग्रह – या महिन्यात शनी ग्रह आपल्याला पहाटे सुर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर कुंभ तारकासमुहामध्ये आढळेल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्याच्या जवळ असलेला शनी ग्रह महिना अखेरपर्यंत सूर्यापासून अधिक दूर जात पूर्व क्षितिजावर अधिक वर आढळेल. दिनांक ११ एप्रिल २०२४ रोजी शनी आणि मंगळ या दोन ग्रहांची युती पाहायला मिळेल. यावेळी हे दोन ग्रह एकमेकांच्या साधारण अर्धा अंश इतक्या जवळ येतील. दिनांक ६ एप्रिल २०२४ रोजी शनी – मंगळ आणि चंद्र या तिघांची युती पहायला मिळेल.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia