सर्पिलाकृती भुजा असलेल्या आपल्या आकाशगंगेच्या एका बाहूमध्ये आपली सूर्यमाला आहे. आपण ज्याला सूर्य म्हणतो त्या ताऱ्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे चंद्र आणि इतर गोष्टी मिळून सूर्यमाला तयार होते. आपली पृथ्वी या सूर्यमालेमध्ये सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यमालेत सर्व ग्रह त्यांच्या भोवती फिरणाऱ्या उपग्रहांना म्हणजेच चंद्रांना घेऊन सूर्याभोवती गोल फिरतात.