धूमकेतू – सूर्यमालेतील पाहुणा

धूमकेतू

आकाशात क्वचितच दिसणारी अतिशय सुंदर व आकर्षक अशी खगोलीय वस्तू म्हणजे धूमकेतू. रात्रीच्या आकाशात लांबलचक पिसार्‍याने जगाचे लक्ष वेधून घेणारा धूमकेतू पुरातन काळापासून भीतीयुक्त औत्सुक्याने पाहिला जातो.

धूमकेतू हे गोठलेल्या कार्बनडायऑक्साईड वायू ( CO 2), बर्फ, धूळ व छोट्या मोठ्या कणांपासून बनलेले असतात. सूर्यापासून दूर असताना ते गोठलेल्या अवस्थेमुळे, पृथ्वीवरून पाहिले असता बिंदुवत दिसतात. मात्र सूर्याजवळ आल्यावर तापून त्यांना प्रचंड मोठी शेपटी फुटल्याचे दिसू लागते. यावेळी धूमकेतूचे तीन भाग स्पष्ट दिसू लागतात. अगदी पुढे असणारा धूमकेतूचा केंद्रभाग किंवा घनभाग म्हणजे न्युक्लिअस. याघनभागाभोवती धुराप्रमाणे वायूचे आवरण असते. त्याला कोमा असे म्हणतात. या कोमातूनच एक लांबलचक शेपटी फुटलेली दिसते. धूमकेतूच्या घन भागाला ‘डर्टी स्नो बॉल’ या नावाने ओळखले जाते. कारण यामध्ये धूळ, काही वायू, बर्फ व कार्बनडायऑक्साईड वायू असतो. हा घनभाग वेड्यावाकड्या आकाराचा असून त्याचा आकार काही मीटर पासून दहा-वीस किलोमीटर पर्यंतचा असू शकतो. हॅलेच्या धूमकेतूचा केंद्र १६ की. मी. लांब व ७. ५ की. मी. रुंदीचा आढळून आला होता. धूमकेतूची शेपटी ही अतिशय विरळ असून, सूर्याच्या उष्णतेमुळे घनभागातील वायू व धूळ तापून बाहेर फेकली गेल्याने दिसू लागते. कोमा हा लाखभर की. मी. व्यासाचा असू शकतो तर त्यातून बाहेर पडलेली धूमकेतूची शेपटी कोट्यवधी की. मी. लांबीची असू शकते. सौरवार्‍यामुळे धूमकेतूची शेपटी सूर्याच्या विरुद्ध बाजूस दिसते. शेपटीचे नीट निरीक्षण केल्यास धूमकेतूस दोन प्रकारच्या शेपट्या फुटलेल्या दिसतात. एक शेपटी सरळ तर दुसरी किंचित वक्र दिसते. सरळ शेपटी ही विद्युतभारित कणांनी बनलेली, सौरवार्‍यामुळे ती सूर्यापासून दूर जात असलेली दिसते. किंचित वक्र असलेली दुसरी शेपटी ही धूमकेतूच्या धूळ व सूक्ष्म कणांनी बनलेली असते. प्रत्येक सूर्यभेटीत धूमकेतू आपले द्रव्य गमावीतच असल्याने काही सूर्यभेटीनंतर त्याचा क्षय होतो व तो नाहीसा होतो. हॅलेचा धूमकेतू दर सेकंदाला २५ ते ३० टन द्रव्य बाहेर फेकतो असे शास्त्रज्ञांना दिसून आले आहे.

आपल्याला दिसणारे धूमकेतू हे आकाशाच्या पोकळीत असलेल्या उर्ट क्लाउड भागातून येत असावेत असे शास्त्रज्ञांना वाटते. याभागात सुमारे शंभर अब्ज धूमकेतू असून काही कारणाने ते आपल्या जागेपासून हालल्यास व सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामध्ये अडकल्यास ते सूर्याकडे खेचले जातात. सूर्याला काही ठराविक अंतरावरून फेरी मारून पुन्हा सूर्यापासून दूर जातात. त्यांचे हे जाणे येणे सतत चालू राहते. शेवटी त्यांच्यातील द्रव्य संपून किंवा ते ग्रहांवर अथवा प्रत्यक्ष सूर्यावर कोसळून नाहीसे होत असावेत असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. काही धूमकेतूंच्या कक्षा अन्वस्त म्हणजे पॅराबोला प्रकारच्या असल्याने हे धूमकेतू एकदा सूर्याजवळ आले की पुन्हा सूर्याकडे येऊ शकत नाहीत मात्र लंबवर्तुळाकार कक्षांचे धूमकेतू ठराविक काळाने सूर्याजवळ येऊन आपले अस्तित्व दाखवतात. यामुळेच हॅलेचा धूमकेतू दर ७५-७६ वर्षांनी आपल्याला दिसतो.

पृथ्वीवर जीवसृष्टी व पाणी कसे निर्माण झाले असावे याचे अनेक सिद्धांत शास्त्रज्ञांनी मांडले आहेत. यापैकी एका सिद्धान्तानुसार पृथ्वीवर धूमकेतू आदळल्याने पाणी व जीवसृष्टी निर्माण झाली असावी. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉवेल व विक्रमसिंघे यांच्या मते धूमकेतूंच्या धुळीत पृथ्वीचा प्रवास होताना काही विषाणू पृथ्वीवर येतात व रोगराई पसरते. अवकाशयाने धूमकेतूवर उतरवून धूमकेतू विषयीचे अधिक ज्ञान मिळवण्याचे स्वप्न पाहत आहेत.

इतर ग्रहांच्या माहितीसाठी खाली क्लिक करा.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia