मंगळ

मंगळ

सूर्यापासून चौथा ग्रह म्हणजे मंगळ. याचा व्यास पृथ्वीच्या व्यासाच्या निम्म्याहून थोडा जास्त म्हणजेच ६, ७९५ कि. मी. आहे. पृथ्वीच्या मानाने हा पहिला बहीर्ग्रह असल्याने आपणास हा ग्रह संपूर्ण रात्रभर देखिल दिसतो. सूर्यापासून याचे अंतर साधारणतः २२७, ९३६, ६४० कि. मी. ( 1.52366231 A. U.) आहे.

मंगळाचा देखिल आस सूर्यभ्रमण कक्षेशी २५. १९ अंशांनी कललेला असल्याने मंगळावर देखिल पृथ्वीप्रमाणे उन्हाळा व हिवाळा असे ऋतू अनुभवयास येतात.

मंगळाचे सूर्यापासूनचे अंतर हे पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतराच्या सुमारे दीडपट आहे. या ग्रहास स्वतःभोवती फिरण्यासाठी २४ तास ३६ मिनिटे लागतात. तर सूर्याभोवती फिरण्यास ६८७ दिवस लागतात.

हा ग्रह रंगाने लालसर तांबडा दिसतो. मंगळावर अनेक ठिकाणी ज्वालामुखी आढळले आहेत. ज्यामधील काही ज्वालामुखी अजूनही कार्यरत आहेत. निरीक्षणाद्वारे मंगळावर कालव्यांच्या खुणा आढळल्या आहेत. ज्यावरून असा अंदाज लावला जातो की पूर्वी या ग्रहावर पाणी वाहत असावे व या ग्रहावर देखिल पृथ्वीप्रमाणे सजीव सृष्टी असावी. मंगळावरील ध्रृवीय भागात मोठ्या प्रमाणात गोठलेल्या अवस्थेत बर्फ आढळले आहे.

मंगळाच्या सूर्याच्या बाजूने असलेल्या भागाचे तापमान २० अंश तर सूर्याच्या विरुद्ध भागाचे तापमान १८० अंश असते.

मंगळाला दोन चंद्र आहेत. जवळच्या चंद्राचे नाव फोबॉस व दूरच्या चंद्राचे नाव डिमॉस आहे.

सूर्य मालेतील सर्व ग्रह व त्यांचे चंद्र गोलाकार आकाराचे आहेत, तर फक्त मंगळाचे चंद्र त्यांना अपवाद आहेत. दोन्ही चंद्रांना पद्धतशीर गोलाकार आकार नाही. ते वेडे वाकडे आहेत व त्याचा आकार देखिल फार लहान आहे. फोबॉस मंगळापासून साधारणतः ५, ८८० मैलावर आहे व एक दिवसात तो मंगळास प्रदक्षिणा घालतो. तर डिमॉस मंगळापासून साधारणातः १४, ६०० मैलावर आहे व मंगळाभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास त्यास ३० तास ९८ मिनिटे लागतात.

इतर ग्रहांच्या माहितीसाठी खाली क्लिक करा.