अरोरा – प्रकाशाचे पट्टे

अरोरा - प्रकाशाचे पट्टे

पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुविय भागामध्ये रात्रीच्या आकाशामध्ये दिसणार्‍या प्रकाशाच्या पट्ट्यांना ‘अरोरा’ असे म्हणतात. त्यांनाच इंग्रजीमध्ये “northern and southern (polar) lights” असे देखिल म्हणतात. हे प्रकाशाचे पट्टे प्रामुख्याने पृथ्वीच्या ध्रुविय भागामध्येच दिसतात. वातावरणाच्या वरील भागामध्ये हे निर्माण होतात.

पूर्वी उत्तर गोलार्धातील आकाशातील अशा पट्ट्याला ‘अरोर बोरीयालिस’ हे नाव देण्यात आले. अरोरा हे नाव रोमच्या पहाटेची देवता ‘अरोरा’ या वरुन देण्यात आले. तर बोरीयालिसचा ग्रीक मध्ये उत्तरेकडील ‘वारा’ असा अर्थ होतो.

सूर्याकडून येणार्‍या सौरवार्‍याच्या पृथ्वीवरील गुरुत्वीय पट्ट्यांशी झालेल्या घर्षणामूळे हे प्रकाशाचे पट्टे निर्माण होतात. सूर्याकडून येणारे सौरवारे साधारण ४०० कि.मी इतक्या वेगाने आकाशामध्ये फेकले जातात. यामध्ये इलेक्ट्रोन्स, प्रोटॉन्स तसेच जड मूलद्रव्ये, अणू तसेच वातावरणातील इतर घटकांचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे हे प्रकाशाचे पट्टे पृथ्वीपासून १०० ते २५० कि.मी. इतक्या वर निर्माण होतात. सौरवात आणि चुंबकिय क्षेत्र यांमधिल विशिष्ट घटकांमूळे निरनिराळ्या रंगाचे पट्टे निर्माण होतात.

हे चुंबकिय क्षेत्र पृथ्वीच्या ध्रुविय भागामध्ये प्रामुख्याने निर्माण होवून ध्रुविय भागांकडे खेचले जाते. पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्राचे चित्र दाखविलेले आहे.

पृथ्वीचे चुंबकिय क्षेत्र हे ध्रुविय भागामध्ये जास्त कार्यक्षम असल्याने त्याच ठिकाणी रात्रीच्या आकाशामध्ये प्रकाशाचे पट्टे निर्माण होतात. खालील चित्रामध्ये सौरवातापासून म्हणजेच सौरवार्‍यापासून पृथ्वीच्या ध्रुविय भागामध्ये निर्माण होणारे पट्टे दाखविले आहेत.