रात्रीचे निरीक्षण ही खगोलशास्त्रामधिल महत्त्वाची बाजू कारण या शास्त्रामधील संपूर्ण अभ्यासच अवकाशासंबंधी असल्यानेप्रत्येक गोष्ट शेवटी अवकाश निरीक्षणाद्वारेच सिद्ध होऊ शकते. म्हणूनच हौशी खगोल शास्त्रज्ञांची जास्त ओढ ही अवकाश निरीक्षणासंबंधित असते.
प्रत्येक अवकाश निरीक्षणापूर्वी ठराविक पूर्व तयारी करणे आवश्यक असते. जेणे करून अवकाश निरीक्षण करताना कोणताही अडथळा येणार नाही.
१) रात्रीच्या अवकाश निरीक्षणाची जागा ही नेहमी शहरा पासून दूर असावी कारण शहरातील विजेच्या दिव्यांच्या प्रकाशात बहुतेक अंधुक तारे दिसेनासे होतात. तासेच अवकाश निरीक्षणाची रात्र ही साधारण अमावास्येच्या रात्री अथवा त्याच्या आसपास असावी जेणेकरून चंद्रप्रकाशाचा देखील त्रास होणार नाही.
२) टेलेस्कोपची मांडणी काळोख पडण्यापूर्वीकरून घ्यावी, कारण नंतर अंधारात टेलेस्कोपची मांडणी करताना बराच वेळ फुकट जातो.
३) सुरवातीस पश्चिमेकडील तार्यांपासून निरीक्षणास सुरवात करावी कारण ते लवकर मावळणारे असतात.
४) नेहमी कळण्यास सोपा असलेला अवकाशाचा नकाशा सोबत ठेवावा.
५) कोणत्या गोष्टीचे निरीक्षण करायचे आहे ते प्रथम पासूनच ठरवावे.
६) सोबत एक बॅटरी असणे आवश्यक आहे. तसेच शक्यतो त्या बॅटरीवर लाल प्लॅस्टिक (जिलेटीन पेपर) बांधावा. लाल प्रकाशामूळे डोळ्यांना कमी त्रास होतो.
७) अंधार पडण्यापूर्वीच निरीक्षणाच्या जागी पोहचणे सर्वात उत्तम.
८) डोळ्यांवर कोणताही प्रखर प्रकाश पडणार नाही याची मुख्य काळजी घ्यावी.
९) सोबत स्वेटर अथवा शाल फार गरजेचे आहे कारण शहरा बाहेर तापमान फार कमी असते.
१०) वेळोवेळी आपण करीत असलेल्या निरीक्षणाची वहीमध्ये नोंद करावी.
११) जेवणाच्या डब्यामध्ये शक्यतो हलके पदार्थ असावेत जेणे करून जेवल्यानंतर झोप येणार नाही.
१२) उल्का वर्षावाचे निरीक्षण शक्यतो आराम खुर्चीवर बसून अथवा झोपून केले जाते.