थोडक्यात सामान्य ज्ञान

थोडक्यात सामान्य ज्ञान

पृथ्वीचा अक्ष सरळ नसून तो २३.५ अंशांनी कललेला आहे.

१) सूर्यमालेमध्ये फक्त शनीलाच नाही तर गुरु, युरेनस आणि नेपच्युन या ग्रहांना देखिल स्वताभोवती कडी आहे.

२) सात बहिणी नावाने ओळखल्या जाणार्‍या कृत्तिका तारकागुच्छामध्ये प्रत्यक्षात १३० तारे आहेत. त्यातील ७ प्रखर तार्‍यांमूळे त्याला सात बहिणी असे म्हणतात.

३) कृष्णविवराचे गुरुत्वाकर्षण इतके असते की प्रकाशदेखिल त्याच्यापासुन निसटू शकत नाही व त्याजागी गडद काळा गोल दिसतो म्हणुनच त्याला कृष्णविवर असे म्हणतात.

४) अल्बर्ट आईनस्टाईनच्या सिध्दांतानूसार विश्वाला सीमा व मध्य नाही.

५) गॅलिलिओने जेव्हा सर्वप्रथम आपल्या दुर्बिणीने शनी ग्रहास पाहिले तेव्हा शनी ग्रहास ‘कान’ असल्याचे वाटले. नंतर १६५५ मध्ये ख्रिस्टिअन हायजेन (Christian Huygens) याने शनी भोवती मोठी कडी असल्याची कल्पना मांडली.

६) बुध ग्रह जरी सूर्याच्या जवळ असला तरी प्रत्यक्षात शुक्र ग्रहाचे तापमान बुधापेशा अधिक आहे. शुक्रावरील दाट वातावरणामुळे सूर्याची उष्णता त्याच्या पृष्ठभागावर जास्त प्रमाणात जमा होते.

७) प्लॅनेट (Planets) म्हणजेच ग्रह या शब्दाचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये ‘भटक्या’ असा होतो.

८) जेव्हा आपण देवयानी आकशगंगेकडे (Andromeda Galaxy) पाहत असतो (जी आपल्यापासुन २२ लाख प्रकाशवर्षे दूर आहे) तेव्हा आपण २२ लाख वर्षापूर्वीची देवयानी आकाशगंगा पाहत असतो कारण तीच्या पासुन निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला २२ लाख वर्षे लागतात.

९) मृग तारकासमुहातील ‘काक्षी’ (Betelgeuse) हा तारा आकाराने इतका मोठा आहे की त्याला जर आपल्या सूर्याच्या जागी ठेवल तर तो गुरु ग्रहाएवढी जागा व्यापेल.

१०) बुध हा सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह आहे. ताशी १,०७,००० वेगाने तो पुढे सरकतो. (म्हणजेच प्रती सेकंद २९.७५ मैल किंवा प्रती सेकंद ४७.८७ कि.मी.)

११) तुम्ही जर पृथ्वीच्या ध्रुविय भागावर असाल तर साधारण १००० मैल ताशी इतक्या वेगाने पृथ्वीसोबत फिराल, तर पृथ्वीसोबत ताशी ६७,००० मैल इतक्या वेगाने सूर्याभोवती फिरत असाल. सहाजिकच हे खरे जरी असले तरी तीथे प्रत्यक्षात आपण इतक्या वेगाने फिरत असल्याचा कुठलाही अनुभव आपणास येणार नाही.

१२) पृथ्वीवरील सर्वात उंच असलेल्या माउंट एव्हरेस्ट या शिखरापेक्षा मंगळ या आकाराने पृथ्वीपेक्षा लहान असलेल्या ग्रहावर माउंट एव्हरेस्टपेक्षा तिप्पट मोठे ‘ओलंपस मोन्स’ (Olympus Mons) हे शिखर आहे.

१३) सूर्याचे आयुष्य साधारण १० अब्ज वर्षे असून आतापर्यंत जवळपास ४.५ अब्ज वर्षे झाली असून सध्या तो त्याच्या आयुष्यातील मधल्या काळामध्ये आहे.

१४) जरी आपल्या आकाशगंगेमध्ये १,००,००,००,००,००० तारे असले तरीही एखाद्या निरभ्र रात्री आपण नुसत्या डोळ्यांनी फक्त ३००० तारे पाहू शकतो.

१५) शुक्र ग्रह १७७ अंशाने कललेला असल्याने तो इतरांच्या मानाने जवळ जवळ उलटा फिरतो म्हणजेच शुक्रावर सूर्य पूर्वेऎवजी पश्चिमेला उगवतो.

१६) पृथ्वी संपूर्ण गोल नसून ती ध्रुवीय भागाकडे थोडीशी चपटी असून विषुववृत्तावर थोडीशी फुगीर आहे. पृथ्वीच्या गोल फिरण्याने तीच्या आकारामध्ये असा बदल झाला.

१७) शुक्र ग्रहावरील तापमानामुळे त्यावर ‘शीसे’ (Lead) सहज वितळते.

१८) प्रकाशाला पृथ्वीपसून चंद्रापर्यंत पोहचायला फक्त १.२८ सेकंद इतका वेळ लागतो.

१९) सूर्यमालेतील सर्व ग्रहांना एकत्र केले तरीही गुरु ग्रह त्या सर्वांपेक्षा जास्त वजनदार असेल.

२०) मानवाने अवकाशामध्ये बनविलेले ‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’ (International Space Station) ताशी १७,००० हजार मैल इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.

२१) सूर्यापासून निघालेल्या प्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहचायला ८ मिनिटे लागतात म्हणजेच आपण ८ मिनिटे पूर्वीच्या सूर्याला पाहत असतो. याचाच अर्थ एखाद्या क्षणाला सूर्य विझला (त्याचा प्रकाश बंद झाला) तर आपणास कळण्यासाठी ८ मिनिटे लागतील.

२२) न्युट्रॉन तार्‍यावरील चमचाभर द्रव्यदेखिल कोट्यावधी टन इतक्या वजनाचे असते.

२३) चंद्राचा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती फिरण्याचा काळ सारखाच असल्याने हजारो वर्षापासून चंद्राची एकच बाजू पृथ्वीवरुन दिसते.

२४) शनी ग्रहास एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये टाकले तर तो चक्क तरंगेल कारण शनीची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

२५) जरी आपण प्रकाशाच्या वेगाने (प्रती सेकंद १,८६,००० मैल) प्रवास करीत असाल तरी आपल्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकाला पोहचायला आपल्याला १ लाख वर्षे लागतील.