निरीक्षणाची नोंद

निरीक्षणाची नोंद

अवकाश निरीक्षण करताना शक्यतो आपण करीत असलेल्या निरीक्षणाची नोंद करणे आवश्यक आहे हे आपणास माहीत आहेच. परंतु बहुतेक वेळेस आपण कोणत्याही प्रकारची निरीक्षणाची नोंद करीत नाही. निरीक्षणाची नोंद करण्यासाठी कोणत्या गोष्टी लिहिल्या जातात त्या खाली दिल्या आहेत.

१) आपले नाव
२) दिनांक
३) ठिकाण (संपूर्ण पत्ता)
४) अक्षांश
५) रेखांश
६) वातावरण
७) तापमान
८) हवेतील आर्दता
९) ढगाळ आकाशाचे प्रमाण
१०) आपण निरीक्षण करीत असलेला तारा, ग्रह अवकाशस्थ वस्तू इ. सविस्तर माहिती.
११) निरीक्षणाची सुरवातीची वेळ
१२) निरीक्षण शेवट वेळ
१३) चित्र
१४) आराखडा
१५) विशेष नोंद