लहान दुर्बिणीचा वापर

लहान दुर्बिणीचा वापर

आपल्या जवळ लहान आकाराची दुर्बीण असल्यास खालील प्रकारची निरीक्षणे आपण करू शकता.

१. दर दोन-चार दिवसांनी अथवा आठवड्याने सूर्यावरील काळ्या डागांचे निरीक्षण करावे.
टीप – सूर्याचे निरीक्षण करताना टेलेस्कोपला सोलार फिल्टर लावलले असणे आवश्यक आहे, नाहीतर डोळ्यास इजा होईन कायमचे अंधत्व येण्याची शक्यता आहे.

२. शनीच्या कडीच्या कललेल्या स्थितीमध्ये होणारे बदल पाहणे.

३. गुरुच्या चार चंद्रांच्या गुरुभोवती भ्रमणाचे निरीक्षण करणे.

४. बुध ग्रह सूर्यापासून दूर असताना त्याच्या अंशावरून सूर्यास्तानंतर अथवा सूर्योदयापूर्वी त्याचे निरीक्षण करणे.

५. बाह्य ग्रहांच्या वक्रगतीचा अभ्यास करणे.

६. चंद्राद्वारे होणारे ग्रह तार्‍यांचे पिधान पाहणे.

७. ISS, Iridium ह्या कृत्रिम उपग्रहांच्या नोंदीनुसार त्यांचे निरीक्षण करणे.

(ह्या कृत्रिम उपग्रहांच्या पूर्व नोंदीसाठी www.heavens-above.com ह्या वेबसाइटला भेट द्या.)

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia