खगोलीय शब्दसुची

खगोलीय शब्दसुची - अवकाशस्थ वस्तूंची डिरेक्टरी

A - अक्षर

Absolute Magnitude - मूळप्रत - ऍबसल्युट मॅग्निट्यूड

दृश्यप्रत हि ठराविक तार्‍याच्या पृथ्वीवरून दिसणार्‍या दीप्ती ठरविली जाते. ज्या ऍबसल्युट मॅग्निट्यूड तार्‍याची काढावयाची आहे तो ठराविक तारा त्याच्या असलेल्या स्थानापासून १० पार्सेक (३३ प्रकाश वर्षे ) अंतरावर आणावयाचा व तेथून त्याची दीप्ती केवढी दिसेल ते पाहिले जाते.

Accretion - ऍक्रेशन

मोठ्या तार्‍यापासून छोट्या तार्‍याकडे त्याच्या गुरुत्वाकर्षणाने वस्तुमान खेचल्या जाणार्‍या प्रक्रियेस ऍक्रेशन असे म्हणतात. एका विशिष्ट काळानंतर छोट्या तार्‍याभोवती मोठ्या तार्‍याच्या वस्तुमानाची गोल चकती सारखी कडी तयार होते यास ऍक्रेशन डिस्क अस म्हणतात.

Alpha Centauri - मित्र तारा - अल्फा सेंटॉरी

सूर्यापासून अंतराने सर्वात जवळचा प्रखर तारा (अंतर ४. ३६ प्रकाशवर्षे).

Altitude - ऍल्टीट्युड

क्षितिजा पासून वर आकाशात ख-स्वस्तिक (Zenith) पर्यंत अंशामध्ये मोजलेले अंतर.

Antimatter - अँटीमॅटर

असे वस्तुमान जे अस्तित्वात असलेल्या वस्तुमानाच्या विरुद्ध गुणधर्माचे आहे. ज्या वस्तुमानामध्ये प्रोटॉन्सना ऋण (निगेटिव्ह ) गुणधर्म आहे आणि इलेक्ट्रॉन्सना धन (पॉझिटिव्ह ) गुणधर्म आहे.

Antipodal point - अँटीपॉडल बिंदू (पॉईंट)

तो बिंदू जो एखाद्या ग्रहाच्या दिसणार्‍या भागाच्या अथवा कोणत्याही भागावरील बिंदूच्या विरुद्ध भागावरील बिंदू. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील उत्तर ध्रृवावरील बिंदूच्या विरुद्ध बिंदू म्हणजेच दक्षिण ध्रृव बिंदू.

Apastron - ऍपस्टॉन

दोन जोडतारकांमधिल (Binary Stars) मधील एकमेकांपासून सर्वाधिक दूर असतानाचे अंतर.

Aperture - ऍपर्चर

प्रकाश जाण्यासाठी कॅमेरा अथवा टेलेस्कोप यांच्यासारख्या वस्तूमध्ये भिंगासमोर असलेले गोल छिद्र. या छिद्राद्वारे प्रकाश आत जाऊन चित्र तयार होते. ऍपर्चरच्या आकाराचा आकडा जेवढा जास्त तेवढे छिद्र लहान व ऍपर्चरच्या आकाराचा आकडा जेवढा कमी तेवढे छिद्र मोठे.

Aphelion - ऍपेहेलियन

एखाद्या ग्रहाचा सूर्य प्रदक्षिणा कक्षेतील सूर्यापासूनचा सर्वाधिक दूरच्या अंतरावरील स्थान.

Apogee - ऍपॉगी

सूर्य प्रदक्षिणा कक्षेतील पृथ्वीचे सूर्यापासूनचे सर्वाधिक दूरच्या अंतरावरील स्थान.

Apparent Magnitude - दृश्यप्रत - ऍपरंट मॅग्निट्युड

पृथ्वीवरून पाहणार्‍या निरीक्षकास एखाद्या तार्‍याची नुसत्या डोळ्यांनी दिसणार्‍या दीप्तीवरून काढली गेलेली प्रत.

Arc Second - आर्क सेकंद

अंशात्मक लहानात लहान मोजलेले अंतर ६० आर्क सेकंद म्हणजे १ आर्क मिनिट म्हणजेच १ आर्क डिग्री म्हणजेच ३६०० आर्क सेकंद. तसेच १आर्क सेकंद म्हणजे सूर्यावरील ७२५ कि. मि.

Arc Degree - आर्क डिग्री

अंशात्मक अंतर ज्यामध्ये ३६० आर्क डिग्री मिळून एक पूर्ण गोल (full circle) तयार होते.

Arc Minute - आर्क मिनिट

एक डिग्रीचा ६० वा भाग अथवा ६० आर्क मिनिटे म्हणजे एक डिग्री.

Asteroid - लघुग्रह - ऍस्टेरॉईड

आकाराने फारच लहान असल्याने ग्रहाचे स्थान न मिळालेला मोठा खडक अथवा दगड. ह्यांचा आकार उल्कांपेक्षा मोठा पण ग्रहांपेक्षा लहान असतो. सूर्यमालेमध्ये मंगळ आणि गुरू ग्रहांमध्ये ह्या लघुग्रहांचा पट्टा आढळतो.

Astrochemistry - खगोलीय रसायनशास्त्र - ऍस्ट्रोकेमिस्ट्री

विज्ञानाचीच एक शाखा ज्यामध्ये अवकाशातील तार्‍यांमधील वायू आणि धूळ यांचा अभ्यास केला जातो.

Astronomical Unit - AU - खगोलीय एकक - ऍस्ट्रोनॉमी युनिट

सूर्य आणि पृथ्वी यांमधील अंतर म्हणजेच एक खगोलीय एकक. सूर्य आणि पृथ्वी यांमधील सरासरी अंतर १४९, ५९७, ८७० कि. मी. आहे.

Aurora - अरोरा

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीच्या ध्रृवीय भागाकडे खेचली जातात. त्यामुळे वातावरणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये देखिल आकाशात एक प्रकाश झोत दिसतो त्यालाच अरोरा असे म्हणतात.

Aurora Borealis - अरोरा बोरियालीस

पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीच्या ध्रृवीय भागाकडे खेचली जातात. त्यामुळे वातावरणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये देखिल आकाशात एक प्रकाश झोत दिसतो त्यालाच अरोरा असे म्हणतात. तसेच पृथ्वीच्या उत्तर ध्रृवाच्या बाजूला दिसणार्‍या प्रकाशझोतास अरोरा बोरियालीस असे म्हणतात.

Aurora Australis - अरोरा ऑस्ट्रालीस

पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे सूर्याकडून येणारी अतिनील किरणे पृथ्वीच्या ध्रृवीय भागाकडे खेचली जातात. त्यामुळे वातावरणामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये देखिल आकाशात एक प्रकाश झोत दिसतो त्यालाच अरोरा असे म्हणतात. तसेच पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवाच्या बाजूला दिसणार्‍या प्रकाशझोतास अरोरा ऑस्ट्रालीस असे म्हणतात.

Autumnal equinox - शरद संपात - ऑटमनल इक्विनॉक्स

पृथ्वीचा अक्ष २३. ५ अंशाने कललेला असल्यामुळे सूर्य प्रदक्षिणा करताना सूर्य काही काळ पृथ्वीच्या इतर भागाच्या जवळ असतो तर काही काळ पृथ्वीच्या दक्षिण भागाजवळ असतो. सूर्य ज्या वेळेस पृथ्वीच्या दक्षिण भागाच्या सर्वात जवळ असतो त्या भागास शरद संपात बिंदू असे म्हणतात.

Axial inclination - अक्षाचा कल

एखादा ग्रह त्याच्या उत्तर-दक्षिण अक्षापासून किती कललेला आहे ते पाहिले जाते. हा कल त्या ठराविक ग्रहाच्या परिभ्रमण कक्षेवरून काढला जातो.

Axis - अक्ष

एक अशी अदृश्य रेषा जी एखाद्या स्वतःभोवती फिरणाऱ्या वस्तूच्या बरोबर मध्यभागातून गेली असेल. ह्यालाच ध्रृव असे देखिल म्हणतात.

Azimuth - ऍझिमथ

असे अंतर जे क्षितिजाला समांतर व उत्तर दिशेपासून मोजले जाते.

D - अक्षर

Dark Matter - कृष्ण पदार्थ - डार्कमॅटर

विश्वातील असे वस्तुमान जे अस्तित्वात आहे परंतु दिसत नाही. जे अदृश्य आहे पण ज्यांचा गुरुत्वीयबलाचा परिणाम मात्र इतर अवकाशस्थ गोष्टींवर दिसून येतो.

Declination - क्रांती - डेक्लिनेशन

एखाद्या अवकाशस्थ वस्तूचे, ग्रहाच्या अवकाशीय विषुववृत्तापासून मोजले गेलेले अंशात्मक अंतर.

Disk - चकती - डिस्क

सूर्याचा दृश्यभागाचा आकार अथवा एखादी अवकाशस्थ वस्तूचे चित्र.

Doppler Effect - डॉप्लर इफेक्ट

प्रकाशाच्या अथवा आवाजाच्या तरंग लांबीमधिल बदल जो एखाद्या विशिष्ट वस्तूपासून निघालेला आहे आणि संबंध निरीक्षकाच्या जागेवर अवलंबून आहे. जर एखादी वस्तू निरिक्षका पासून दूर जात असेल तर त्यामुळे तरंग लांबीच्या लहान रेषा निळ्या रंगाकडे सरकलेल्या दिसतात. तर या उलट एखादी वस्तू निरीक्षकाजवळ येत असेल तर त्यामुळे तरंगलाबींच्या मोठ्या रेषा लाल रंगाकडे सरकलेल्या दिसतात. सध्या डॉप्लर इफेक्ट हा प्रयोग एखाद्या अवकाशस्थ वस्तूचा वेग आणि दिशा ठरविण्यासाठी करतात.

Double Star - जोडतारका - डबलस्टार

काही वेळेस पुढेमागे असलेल्या दोन तारका निरीक्षकास एकत्र अथवा एकाच जागी दिसतात. ह्या दोन तारका काही वेळेस पुढेमागे असतात तर काही वेळेस एकत्र देखिल एकमेकांभोवती फिरत असतात.

F - अक्षर

Fireball - फायरबॉल

अतिशय प्रखर उल्का. काही वेळेस फायरबॉल चंद्राच्या प्रकाशापेक्षा देखिल कितीतरी पटीने प्रखर असतो.

G - अक्षर

Galactic Nucleus - गुरुत्वीय बिंदू - गॅलेक्टिक न्युक्लिअस

आकाशगंगा मध्ये असणार्‍या तारे आणि वायू यांमधील अतिघन गुरुत्वीय बळ असलेले केंद्र.

Galactic Halo - गुरुत्वीय कडा - गॅलेक्टिक हेलो

आकाशगंगांच्या केंद्रीय गाभ्याभोवती अथवा बाहेरील बाजूस असणार्‍या गोलाकार कडेस गुरुत्वीय कड असे म्हणतात.

Galaxy - आकाशगंगा - गॅलेक्सी

अब्जावधी तारकांचा समूह. आपला सूर्य ज्या आकाशगंगेमध्ये आहे त्यास इंग्रजीत – मिल्की वे – असे म्हणतात. विश्वामध्ये अशा अब्जावधी आकाशगंगा आहेत. अजून देखिल आकाशगंगांची उत्पत्ती कशी आणि केव्हा झाली ह्यावर संशोधन चालू आहे. आकाशगंगा निरनिराळ्या आकारामध्ये आणि स्वरूपाच्या असू शकतात. आपल्या आकाशगंगेचा आकार सर्पिलाकृती आहे आणि त्यामध्ये काही अब्ज तारे आहेत. काही आकाशगंगा अशा आहेत की ज्यांचा प्रकाश आपणापर्यंत येण्यास हजारो वर्षे लागतात. सर्पिलाकृती (spiral), गोलाकार (elliptical) आणि वेडीवाकडी (irregular) असे आकाशगंगांचे तीन मुख्य भाग आहेत.

Galilean Moons - गॅलिलिओचे चंद्र - गॅलिलीअन मून

आयो (Io), युरोपा (Europa), कॅलिस्टो (Callisto) आणि गॅनिमेड (Ganymede) ह्या गुरू ग्रहाच्या चार चंद्रांना हे नाव देण्यात आले आहे. ह्याचा शोध गॅलिलिओ गॅलेली याने लावल्यामुळे त्याचे नाव देण्यात आले.

Giant Molecular Cloud (GMC) - मुलद्रव्यांचा मोठा ढग - जायंट मॉलीक्युलर क्लाऊड

अवकाशाच्या पोकळीमध्ये आढळणार्‍या मोठ्या ढगांना ज्यामध्ये प्रामुख्याने हायड्रोजन हा वायू सापडतो. तसेच ज्यामध्ये नवीन तार्‍याच्या निर्मितीसाठी आवश्यक वस्तुमान आहे.

Globular Cluster - बंदिस्त तारकागुच्छ - ग्लोब्युलर क्लस्टर

एक अतीघन आणि जेथे शेकडो ते हजारो तारका दाटीवाटीने आढळतात. बंदिस्त तारकागुच्छामध्ये प्रामुख्याने वृद्ध तारे मध्य भागामध्ये आढळतात.

Gravitational Lens - गुरुत्वीय भिंग - ग्रॅव्हिटेशनल लेंस

प्रचंड वस्तुमान असलेली आकाशगंगा अथवा एखादा तारा त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याच्या मागून येणार्‍या तार्‍याचा अथवा आकाशगंगेचा प्रकाशाचा सरळ मार्ग बदलून त्याला वक्रता आणतो. त्यामुळे त्यामागील वस्तूची दिशा बदललेली दिसते अथवा त्याच्या दोन समान प्रतिमा दिसतात.

Gravity - गुरुत्वाकर्षण - ग्रॅव्हिटि

एखाद्या पदार्थिय वस्तुमान असलेल्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीला आपल्या जवळ खेचण्याचा एक नैसर्गिक गुणधर्म.

I - अक्षर

Inclination - इंक्लिनेशन

पृथ्वीला गृहीत धरून इतर ग्रहांच्या फिरण्याच्या कक्षेचा कल म्हणजे इंक्लिनेशन.

Interstellar Medium - इंटरस्टेलार मीडिअम

दोन तार्‍यांच्या मध्ये असलेला वायू आणि धूळ.

Irregular Galaxy - वेडीवाकडी आकाशगंगा

अशा आकाशगंगा ज्यांना कोणताही पद्धतशीर आकार नाही.

L - अक्षर

Lenticular Galaxy - लेंटिक्युलर आकाशगंगा

चकतीच्या आकाराच्या आकाशगंगा ज्यांचा आकार पद्धतशीर असेलच असे नाही. ह्या प्रकारातील आकाशगंगेचा कल हा लंब वर्तुळाकार असण्यावर असतो.

Light Year - प्रकाशवर्ष

म्हणजे प्रकाशाने एका वर्षात केलेला प्रवास. प्रती सेकंद प्रकाश ३,००,००० किलोमीटर (६७१ दशलक्ष मैल प्रती तास). म्हणजे एक प्रकाश वर्ष म्हणजे ९.४६०५३E१२ किलोमीटर, ५,८८०,०००,०००,००० मैल किंवा ६३.२४० खगोलीय एकक (63,240 A.U.)

Limb - लिंब

ग्रह किंवा इतर अवकाशीय वस्तूंची बाहेरील कडा अथवा कवच.

Local Group - स्थानिक समूह

आपल्या आकाशगंगे सारख्या साधारण डझनावारी आकाशगंगांचा एक छोटासा समूह.

Luminosity - दीप्ती

तार्‍यापासून मिळणारा एकूण प्रकाश.

Lunar Eclipse - चंद्र ग्रहण

एक अशी घटना ज्यावेळेस चंद्रावरून पृथ्वीची सावली जाते. पृथ्वीच्या सावलीमुळे अर्धप्रमाणात झाकलेल्या चंद्र ग्रहणास खंडग्रास चंद्र ग्रहण असे म्हटले जाते. तर पृथ्वीच्या सावलीमुळे पूर्णतः झाकलेल्या चंद्र ग्रहणास खग्रास चंद्र ग्रहण असे म्हणतात.

Lunar Month - चांद्र महिना

दोन पूर्णतः अमावास्या किंवा पौर्णिमा यांच्यामधील सरासरी काळ. एक चांद्र महिना २९ दिवस, १२ तास आणि ४४ मिनिटांचा असतो.

Lunation - चंद्रकाळ

दोन पूर्ण चंद्र भ्रमणातील अथवा एक अमावास्या ते दुसरी अमावास्या या काळामधील मध्यांतर. चंद्रकाळ हा २९ दिवस, १२ तास आणि ४४ मिनिटांचा असतो.

N - अक्षर

तेजोमेघ - Nebula

अवकाशामध्ये असलेला धुळीचा आणि वायूचा ढग यामध्येच पुढे मग गुरुत्वाकर्षण निर्माण होऊन नवीन तार्‍यांचा जन्म होतो.

न्यूट्रॉन तारा - Neutron Star

एका स्फोट झालेल्या तार्‍याचा गुरुत्वाकर्षणाने दाबून लहान झालेला गाभा, ज्यामध्ये फक्त न्यूट्रॉन हे मूलकण असतील. न्यूट्रॉन तार्‍याची गुरुत्वाकर्षण शक्ती प्रचंड असते. काही वेळेस हे तारे स्पंदने देखिल देतात. ज्यांना पल्सार असे म्हणतात.

न्यूट्रॉन - Neutron

कोणताही विद्युतभार नसलेला मूलकण. एक न्यूट्रॉन हा एका इलेक्ट्रॉनपेक्षा १८३९ पट जड असतो.

न्यूटनच पहिला नियम - Newton’s First Law of Motion

बाहेरून कोणताही दाब न दिल्यास एखादी सरळ रेषेमध्ये जाणारी वस्तू सारख्याच वेगाने आणि कालाने त्याच मार्गाने जात राहील.

मुलबिंदू - न्युक्लियस - Nucleus

अणूचा धन विद्युतभारित गाभा. ज्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स (हायड्रोजनचे सोडून) इलेक्ट्रॉन भोवती फिरत असतात.

P - अक्षर

पॅरलॅक्स - Parallax

एखाद्या गोष्टीला दोन निराळ्या जागेवरून पाहिल्यास त्या गोष्टीच्या बदललेल्या जागेचा दिसणारा कोन.

पार्सेक - Parsec

खगोलशास्त्रामध्ये वापरले जाणारे सर्वात मोठे अंतर. एक पार्सेक म्हणजे ३. २६ प्रकाशवर्ष.

उपछाया - Penumbra

काही प्रमाणात प्रकाश गडद छायेचा भाग. जो ग्रहणामुळे दिसतो.

B - अक्षर

Barycenter - बॅरीसेंटर

सर्व वस्तुमानाच्या केंद्रातील वस्तुमान. उदा. सूर्यमालेतील केंद्रीय वस्तुमान.

Big Bang - महाविस्फोट - बिगबँग

असा एक सिद्धांत ज्यामध्ये सांगितले आहे कि विश्वाची उत्पत्ती अवकाशाच्या एका बिंदूच्या महास्फोटातून झाली असावी. त्या महास्फोटामुळेच सध्या विश्वाचे आकारमान वाढत आहे असे दिसते.

Binary Stars - जोडतारका - बायनरी स्टार्स

असे दोन तारे जे समान केंद्रीय गुरुत्वाकर्षण एकमेकाभोवती फिरत आहेत.

Black Hole - कृष्णविवर - ब्लॅक होल

एक महाप्रचंड गुरुत्वीय बल. काही प्रकारच्या महाराक्षसी तार्‍यांचा त्यांच्या मृत्यू समयी त्यामधील इंधन संपल्यावर ते स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामध्ये अडकतात आणि तो तारा स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे लहान-लहान होत अखेर बिंदूवत होत अखेर शेवटी अदृश्य होतो. ह्या अवस्थेस सिंग्युल्यॅरीटी असे म्हणतात. अशावेळी त्याचे वस्तुमान प्रचंड झालेले असते. त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्यापासून निघालेला प्रकाश देखिल त्याच्याकडे पुन्हा खेचला जातो.

Blueshift - ब्लु शिफ्ट

एखाद्या तार्‍याचा वर्णपटल घेतला असता त्यामध्ये असलेल्या रेषा निळ्या बाजूस सरकणे. ब्लु शिफ्टद्वारे तो ठराविक तारा आपल्या दिशेने येत आहे हे कळते. तर जेवढी ब्लु शिफ्ट जास्त तेवढा तो तारा वेगाने आपल्या दिशेने येत आहे.

C - अक्षर

Celestial Equator - अवकाशीय विषुववृत्त - सेलेस्टिअल इक्वेटर

एक अशी समांतर पातळी जी पृथ्वी आणि अवकाश यांच्याशी समांतर असेल.

Celestial Pole - अवकाशीय ध्रुव - सेलेस्टिअल पोल

अवकाश गोलाचे उत्तर आणि दक्षिण असे दोन ध्रुव जिथे पृथ्वीचे परिवलन अक्ष एकमेकांना छेदतात.

Celestial Sphere - अवकाशीय गोल - सेलेस्टिअल स्फिअर

एक असा काल्पनिक अवकाशीय गोल ज्यामध्ये पृथ्वी केंद्रस्थानी आहे आणि आपण त्या गोलावर तार्‍यांना पाहत आहोत.

Cepheid - सेफिड

आकारमान बदलणारा रुपविकारी तारा. रुपविकारी तार्‍यांच्या प्रकारातील एक विशिष्ट प्रकार ज्यामध्ये तो ठराविक तारा आपल्या आकारमानासोबत दीप्ती देखिल विशिष्ट कालांतराने कमी जास्त करतो. सध्याच्या प्रगत विज्ञानामध्ये अशा तार्‍यांचा उपयोग त्यांचे आपल्या पासूनचे अंतर मोजण्यासाठी होतो.

Chromatic Aberration - भिंगिय विषमता - क्रोमॅटिक ऍबरेशन

काहीवेळेस विशिष्ट प्रकारचे काचेचे भिंग प्रकाशकिरणांचे वक्रिभवन करून वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळ्या रंगछटा दाखवितो. असा प्रत्यय त्या भिंगाच्या कडेस जाणवितो.

Chromosphere - क्रोमोस्फिअर

सूर्याच्या गाभ्यातील एक प्रकारचा थर जो प्रोटोस्फिअरच्या आणि गाभ्यावरील बदलणार्‍या भागावर असतो. क्रोमोस्फिअर प्रोटोस्फिअरच्या मानाने अतिशय तप्त असते परंतु मध्य गाभ्याच्या मानाने हे तापमान कमी असते.

Circumpolar Star - ध्रुवतारा - सर्कमपोलार स्टार

असा तारा जो कधीच मावळत नाही. जो नेहमीच क्षितिजाच्या वर दिसतो. हे निरीक्षकाच्या जागेवर अवलंबून आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात काही फिकट तारे ध्रुवाजवळ आहेत. परंतु पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात एक ठळक तारा ध्रुवाजवळ आहे. त्यालाच आपण ध्रुवतारा व इंग्रजीमध्ये पोलारिस असे म्हणतो.

Coma - कोमा

धूमकेतूच्या मुख्य डोक्याजवळ असलेल्या वायूमय आवरणाला कोमा असे म्हणतात. ह्यामध्ये प्रामुख्याने वायू असतात. सूर्य किरणांमुळे हा वायू तप्त होऊन त्यामधील बर्फमय धुळीकण सुटे होतात. नंतर ह्या पासून धूमकेतूला शेपटी तयार होते. जी धूमकेतूच्या मुख्य गाभ्या पासून हजारो मैल मोठी होते.

Comet - धूमकेतू - कॉमेट

सर्वसाधारणपणे सूर्यमालेत प्रवेश करताच धूमकेतू मागे आपणास शेपटी आलेली दिसेल. हि शेपटी बर्फाच्छादित धुळीकणांची असते व जसं जसा तो धूमकेतू सूर्याच्या अधिक जवळ येऊ लागतो, त्यावेळेस हे बर्फाच्छादित धुळीकण विरघळून अलग होतात आणि धूमकेतूमागे धुळीकणांची एक शेपटी तयार होते. ज्यामुळे धूमकेतू एखाद्या झाडूसारखा दिसू लागतो. काही आठवड्यांमध्येच तो आपली सूर्य प्रदक्षिणा संपवून पूर्ववत दूर जाऊ लागतो व त्याबरोबर त्याची शेपटी देखिल लहान होत अदृश्य होते.

Conjunction - युती - कंजक्शन

जेव्हा दोन किंवा अनेक अवकाशस्थ वस्तू एकमेकांजवळ दिसू लागतात ह्या घटनेला युती असे म्हणतात.

Constellation - तारकासमूह - कॉन्स्टलेशन्स

अवकाशातील तारकांचा असा समूह ज्यामुळे त्या तार्‍यांचा एखादा मोठा विशिष्ट आकार दिसतो. अवकाशात असे ८८ तारकासमूह आहेत.

Corona - करोना

सूर्यावरील वातावरणातील सर्वात बाहेरचा थर. ज्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे वायू असतात. अतिशय विरळ असून देखिल त्यांचे तापमान १ लाख डिग्री केल्विन एवढे असते. नुसत्या डोळ्यांना हा करोना फक्त सूर्यग्रहणाच्या वेळेसच पाहायला मिळतो.

Cosmic Ray - वैश्विक किरण - कॉस्मिक रे

अण्विक कण (ज्यामध्ये प्रामुख्याने प्रोटॉन्स असतात) जे अंतराळातून येऊन पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात. हे कण प्रचंड ऊर्जामय असतात.

Cosmology - मूळशास्त्र - कॉस्मोलॉजी

विज्ञानाची एक अशी शाखा ज्यामध्ये उत्पत्ती, मूळ, रचना आणि नैसर्गिक विश्वाचा अभ्यास केला जातो.

Crater - खळगे - क्रेटर

गोलाकार मोठा खड्डा जो लघुग्रह अथवा उल्का आदळल्याने तयार झाला असेल. तसेच जो ज्वालामुखीच्या अंतर दाबामुळे देखिल तयार झाला असेल.

E - अक्षर

Eclipse - ग्रहण - एक्लिप्स

एका अवकाशस्थ वस्तूमुळे अथवा दुसर्‍या वस्तूचा प्रकाश पूर्णतः अथवा अंशतः अडविला जाणे.

Ephemeris - एफिमेरीज

तारखेनुसार पद्धतशीर मांडलेली माहिती उदा. सर्वसामान्यपणे सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांच्या जागेची दररोजची माहिती अथवा दररोजची इतर अवकाशस्थ वस्तूंबद्दलची माहिती.

Equinox - संपात बिंदू - इक्विनॉक्स

असे दोन बिंदू जेथे सूर्याचा आयनिक मार्ग हा पृथ्वीच्या विषुववृत्तास छेदतो. ह्या दोन बिंदूंना वसंत आणि शरद असे म्हणतात. दरवर्षी सूर्य २१ मार्च रोजी वसंतसंपात बिंदूवर असतो तर २२ सप्टेंबर रोजी शरद संपात बिंदूवर असतो.

Escape Velocity - मुक्तीचा वेग - एस्केप वेलॉसिटी

एखाद्या ग्रहापासून अथवा अवकाशस्थ वस्तूच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी लागणारा वेळ.

Event Horizon - इवेंट होराईझन

कृष्णविवराभोवती असलेली त्याची अदृश्य सीमा त्याच्या आत गेल्यास कोणीही मुक्त होऊ शकत नाही. इतकेच की प्रकाश देखिल परत आत मागे खेचला जातो.

Evolved Star - मृतावस्थेकडे चाललेला तारा - इवॉल्व स्टार

आपला आयुष्यक्रम संपवून मृत्युपंथाला चाललेला तारा. अशा अवस्थेमध्ये त्या ठराविक तार्‍यातील इंधन संपलेले असते आणि आता तो आपले वस्तुमान गमावीत असतो.

Extragalactic - एक्स्ट्रागॅलॅक्टिक

एक शब्द जो बाहेरील अथवा आपल्या आकाशगंगेपलीकडील वस्तूंसाठी वापरला जातो.

Extraterrestrial - अंतरीक्ष स्थलीय - एक्स्ट्रा टेरेस्टिअल

एक शब्द जो पृथ्वीच्या बाहेर निर्माण झालेल्या वस्तूंसाठी वापरला जातो.

Eyepiece - आयपीस

टेलेस्कोपच्या शेवटी लावली जाणारी भिंग. ज्यामध्ये पाहून निरीक्षक पाहत असलेल्या वस्तूचा आकार मोठा करतो. निरनिराळ्या क्षमतेच्या भिंगामुळे वस्तूचे आकारमान मोठे दिसते.

H - अक्षर

Heliocentric - सूर्य केंद्रीय - हेलिओसेंट्रिक

सूर्य केंद्रीय स्थानी असणे.

Heliosphere - सूर्य केंद्रीय अवकाश - हेलिसोस्फिअर

संपूर्ण सूर्यमाला असेल असा एक अवकाशातील काल्पनिक गोल.

Helium - हिलियम

द्वितीय क्रमांकावरील आणि वजनाने अतिशय हलका वायू. हिलियमच्या अणू गर्भामध्ये दोन प्रोटॉन्स आणि दोन न्यूट्रॉन्स हे दोन इलेक्ट्रॉन्सच्या भोवती फिरत असतात.

Hemisphere - हेमिस्फिअर

असा एक अवकाशीय काल्पनिक गोल जो क्षितिज, पृथ्वीचा विषुववृत्त किंवा आयनिक वृत्त ह्या ठिकाणी दोन भागांमध्ये विभागला गेला आहे.

Hour Angle - आवर अँगल

उत्तर दक्षिण ह्या दिशांवर ख-स्वस्तिक (निरीक्षकाच्या डोक्यावरील बिंदू) वरून पृथ्वीच्या विषुववृत्ताशी समांतर पातळीत वरून खाली टाकलेला लंब.

H-R Diagram - एच आर डायग्राम

रंगात्मक दृश्य प्रतीचा आलेख. ज्यामध्ये एका विशिष्ट तार्‍याचे त्याच्या वर्णपटलावरून रंगावरून स्थान ठरविले जाते. रुसेल (Russell) आणि हर्टझस्पंग (Hertzsprung) ह्यांनी १९३१ मध्ये सर्वप्रथम हा आलेख तयार केल्यामुळे त्यांचे नाव देण्यात आले.

Hubble’s Law - हबलचा नियम - हबल्स लॉ

ह्या नियमानुसार आपल्या पासून सर्वात दूर असणार्‍या आकाशगंगा ह्या तितक्याच वेगाने दूर जात आहेत.

Hydrogen - हायड्रोजन

वजनाने हलका आणि ज्वलनशील वायू. हायड्रोजनच्या अणू गर्भामध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेल्ट्रॉन असतो. मध्यभागी फक्त एक प्रोटॉन असतो. सूर्याचा ७५ टक्के भाग हायड्रोजनचा आहे. तर पृथ्वीवर ह्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. हायड्रोजन हा विश्व निर्मितीतील महत्त्वपूर्ण भाग आहे. प्रचंड हायड्रोजन असलेल्या वायूच्या ढगापासून तार्‍यांची निर्मिती होते.

K - अक्षर

Kelvin - केल्विन

वातावरणातील तापमान मोजण्यासाठी खगोलशास्त्रामध्ये केल्विन हे मापक वापरले जाते. पाण्याचे बर्फ होण्याच्या पातळीपर्यंत केल्विन मापक हे साधारण सेल्सियस ह्या मापका सारखेच आहे. शून्य सेल्सियस म्हणजे २७३ डिग्री केल्विन होय. पूर्णतः शून्य म्हणजे सर्वात जास्त थंड तापमान. शून्य डिग्री केल्विन म्हणजेच -२७३. १६ डिग्री सेल्सियस.

Kepler’s First Law - केप्लरचा पहिला नियम

सूर्यापासून निघालेला प्रकाश सर्व दिशांना सारख्याच वेगाने आणि सारख्याच वेळात जातो.

Kepler’s Second Law - केप्लरचा दुसरा नियम

ग्रहांची सूर्य प्रदक्षिणा करण्याचा कक्ष सूर्य केंद्रित आणि लंब गोलाकार आहे.

Kepler’s Third Law - केप्लरचा तिसरा नियम

ग्रहांच्या भ्रमण कक्षेचा वर्ग हा त्याच्या सूर्यापासून असणार्‍या अंतराच्या घनाच्या प्रमाणात बदलतो.

Kilometer - किलोमीटर

१ किलोमीटर = १००० मीटर = १०५ सेंटिमीटर = ०. ६२ मैल.

Kiloparsec - किलोपार्सेक

म्हणजेच १००० पार्सेक अंतर.

Kuiper Belt - क्युपरबेल्ट

धुलिकण आणि बर्फकणांची एक गोलाकार कडा जीची कक्षा नेप्च्यून ग्रहाच्या पुढे आहे. क्युपरबेल्ट मधील मूलकण हे सूर्यमालेच्या निर्मितीच्या वेळेचे अवशेष असल्याचे मानले जाते. काही खगोलशास्त्रज्ञ प्लुटो आणि त्याचा उपग्रह शेरॉन यांनाच क्युपरबेल्ट मधील गोष्टी मानतात.

M - अक्षर

मॅगेलिनचे ढग - Magellanic Clouds

आपल्या आकाशगंगेच्या बाहेरील थोड्या अंतरावरील दोन वेड्यावाकड्या आकाशगंगा. ह्या दोन आकाशगंगा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसतात.

चुंबकिय क्षेत्र - Magnetic Field

विद्युतभारित कणांमुळे हे क्षेत्र तयार होते. पृथ्वीच्या मानाने सूर्याचे चुंबकिय क्षेत्र फार मोठे आहे. ह्या चुंबकिय क्षेत्राचे उत्तर आणि दक्षिण बिंदू पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात आहेत.

चुंबकिय ध्रुव - Magnetic Pole

चुंबकिय क्षेत्रातील उत्तर आणि दक्षिण बिंदू.

दृश्यप्रत - Magnitude

अवकाशामधिल एखाद्या तार्‍याच्या अथवा इतर गोष्टीच्या दिसणार्‍या प्रकाशावरून त्या तार्‍याची अथवा त्या गोष्टीची प्रत ठरविली जाते. उघड्या डोळ्यांना दिसणारा सर्वात प्रखर तारा -१. ४ प्रतीचा तर अतिशय फिकट तारा ६ प्रतीचा तारा मानला जातो. ह्या प्रकारामध्ये प्रत्येक प्रत ही आधीच्या प्रतीच्या २. ५ प्रखर आहे. म्हणजेच नुसत्या डोळ्यांनी पाहिल्यास १ प्रतीचा तारा हा ६ प्रतीच्या तार्‍याच्या १०० पटीने प्रखर असतो.

वस्तुमान - Mass

एखाद्या वस्तूमध्ये असणार्‍या सर्व गोष्टी, हे त्यामधील अंतर्गत मूलद्रव्य अथवा त्याचा दुसर्‍या वस्तूवरील गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव यावरून ठरविले जाते.

वस्तू - मॅटर - Matter

अशी गोष्ट ज्याला वस्तुमान आहे.

मरीडियन - Meridian

एक काल्पनिक गोल रिंगण जे उत्तर दक्षिण दिशांमधून जाते व ज्यामुळे पूर्व व पश्चिम असे आकाशाचे दोन भाग पडतात. तसेच हे रिंगण निरीक्षकाच्या जागेवर देखिल अवलंबून आहे.

उल्का - Meteor

पृथ्वीच्या वातावरणात असलेले लहान दगड अथवा बर्फाच्छादित धुळीकण.

उल्का वर्षाव - Meteor Shower

लहान दगड अथवा बर्फाच्छादित धुळीकण धूमकेतूमुळे त्याच्या कक्षेच्या मागे राहतात व पृथ्वी जेव्हा ह्या कक्षेमध्ये येते त्यावेळेस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने ते पृथ्वीकडे खेचले जातात. वातावरणामध्ये प्रवेश करताच ते घर्षणाने पेट घेतात व नष्ट होतात. परंतु आकाराने मोठ्या असलेल्या उल्का कधीकधी पृथ्वीवर येऊन पडतात. यालाच उल्का पडणे असे म्हणतात. काही ठराविक दिवशी उल्का पडण्याचे प्रमाण वाढलेले दिसते ज्यास उल्का वर्षाव असे म्हणतात.

O - अक्षर

ऑब्लीक्वीटी - Obliquity

एखाद्या गोष्टीच्या विषुववृत्ताची पातळी आणि त्याच्या भ्रमणकक्षेच्या पातळीचा कोन.

अधिक्रमण - Occultation

अवकाशातील एखाद्या गोष्टीमुळे दुसर्‍या गोष्टीचा प्रकाश अडणे. बहुतेकवेळा ग्रह मध्ये आल्यामुळे मागील तार्‍याचा प्रकाश अडविला जातो.

उर्टचा मेघ - Oort Cloud

धूमकेतूंचे उगमस्थान असलेला एक काल्पनिक गोल ज्याची कक्षा आपल्या सूर्यमालेच्या कक्षेच्या सीमेवर आहे. उर्टचा ढग हे नाव एका डच शास्त्रज्ञाच्या नावाने देण्यात आले ज्याने ही कल्पना मांडली.

खुला तारकागुच्छ - Open Cluster

नवीन तार्‍यांचा समूह जो नुकताच तयार झाला आहे. ज्यांमध्ये अजून पुरेशी गुरुत्वाकर्षण शक्ती नाही काही खुला तारकागुच्छ तर वायूचे आणि धुळीचे ढग देखिल आढळतात ज्यापासून त्यांचा जन्म झाला.

बर्हियुती - Opposition

पृथ्वीवरून पाहिले असता एखादा ग्रह जेव्हा बरोबर सूर्याच्या विरुद्ध दिशेला जातो त्यास बर्हियुती असे म्हणतात.

कक्षा - Orbit

एखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीभोवती फिरण्याचा मार्ग.

कक्षा काळ - Orbital Period

एखाद्या गोष्टीचा दुसर्‍या गोष्टीभोवती फिरून पुन्हा मूळ जागेवर येण्यासाठी लागणारा काळ.