पृथ्वी

पृथ्वी

सूर्य मालिकेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली लाडकी पृथ्वी. या व्यतिरिक्त आणखी दुसर्‍या शब्दांमध्ये वर्णन करायचे म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये आजपर्यंत केलेल्या संशोधनानंतर हे आढळून आले आहे की या ग्रहा व्यतिरिक्त इतर कुठल्याही ग्रहावर जीवसृष्टी नाही.

पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठराविक अंतर आणि वातावरण यामुळेच बहुदा या ग्रहावर सजीव सृष्टी निर्माण झाली असावी. पृथ्वीचा व्यास १२, ७५६ कि. मी. आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर सुमारे १४९, ५९७, ८९० कि. मी. ( 1 A. U.) आहे.

स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला जवळपास २४ तास लागतात. तर सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. यालाच आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वीचा आस तिच्या कक्षाकडे २३. ५ अंशांनी झुकलेला आहे आणि याच अवस्थेत ती स्वतःभोवती आणि सूर्या भोवती प्रदक्षिणा करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा व हिवाळा हे ऋतू क्रम सुरू असतात.

सूर्या पासून निघालेला प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यास साधारणतः ८ मिनिटे लागतात. ( एका सेकंदामध्ये प्रकाश जवळपास ३ लक्ष कि. मी. अंतर पार करतो. ) पृथ्वी वर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. त्यामध्ये थोडा जरी फरक असता म्हणजे पृथ्वी सूर्याच्या थोड्याशा अंतराने जवळ अथवा दूर असती तरी जीवसृष्टी निर्माण झाली नसती.

संशोधनाद्वारे आता असे आढळून आले की पृथ्वी ही स्वतःच एक चुंबक आहे व वातावरणामध्ये तिच्याभोवती एक चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सूर्यापासून येणारे हानिकारक असे जंबुकिरण ( अल्ट्रा वायोलेट ) पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करू शकत नाहीत व ते पृथ्वीच्या ध्रुवीय क्षेत्राकडे वळले जातात.

पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्यास आपण चंद्र म्हणतो.

इतर ग्रहांच्या माहितीसाठी खाली क्लिक करा.