सूर्यानंतर ओळीत सर्व ग्रह पाहिल्यास प्रथम बुध, शुक्र नंतर तिसर्या क्रमांकावर पृथ्वी येते त्यानंतर मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेप्च्यून आणि प्लुटो हे ग्रह आहेत. हे सर्व ग्रह आपआपल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हा ग्रह सूर्यासापेक्ष एका रेषेमध्ये येतात, या घटनेस युती असे म्हणतात.
पृथ्वी ही सूर्यमालेमध्ये तिसरी असल्याने बुध आणि शुक्र हे अंतर्ग्रह आहेत तर पृथ्वी पालीकडील ग्रह बहिर्ग्रह आहेत.
वरील चित्रामध्ये आपणास कळेल की अंतर्ग्रह जेव्हा सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या एका रेषेमध्ये येतात, तेव्हा अंतर्ग्रह जर पृथ्वीच्या जवळ असेल तर त्यास ‘अंतर्युती’ व सूर्याच्या विरुद्ध दिशेस असतील तर त्यास ‘बहिर्युती’ असे म्हणतात.
वरील चित्रामध्ये आपणास कळेल की बहिर्ग्रह जेव्हा सूर्यासापेक्ष पृथ्वीच्या एका रेषेमध्ये येतात, तेव्हा अंतर्ग्रह जर पृथ्वीच्या जवळ असेल तर त्यास ‘प्रतियुती’ सूर्याच्या विरुद्ध दिशेस असतील तर त्यास ‘युती’ असे म्हणतात.