DEL तारकासमुहांचे आकार कसे तयार होतात?

टीप – वरील चित्रात वृश्चिक तारकासमूहातील ताऱ्यांचा काल्पनिक आकार दाखविलेला आहे.

तारकासमुहांचे आकार कसे तयार होतात?

रात्रीच्या अवकाशामध्ये आपणास अनेक तारे दिसतात. ह्या विखुरलेल्या तार्‍यांना नंतर समूहांमध्ये विभागण्यात आले. ह्या समूहांना त्यांच्या काल्पनिक आकृतीनुसार नावे देण्यात आली. समूहामध्ये असलेले तारे जवळ जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र एकमेकांपासून पुष्कळ लांब आहेत.

पृथ्वीवरून तार्‍यांना पाहताना आपण त्यांना एका सरळ रेषेमध्ये पाहत असतो त्यामुळे अवकाशातील एका विशिष्ट अंतराच्या प्रतलामध्ये आपणास ते एका समान अंतरावर समूहाने असल्याचा भास होतो.

वरील चित्रावरून आपणास कळेल की शर्मिष्ठा म्हणजेच Cassiopeia या तारकासमुहातील तारे एकत्र जरी वाटत असले तरी ते ५० ते ३२५ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत.

चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे समोरून पाहिल्यास पुढे-मागे असलेले हे तारे एका सरळ प्रतलामध्ये आढळतात व त्यावरून ते सर्व तारे एकाच समूहातील असल्याचा भास होतो.

टीप :- फक्त विषय समजण्यापुरते वर शर्मिष्ठा तारकासमुहातील तारे ५० ते ३२५ प्रकाशवर्ष एवढ्या अंतरामध्ये विखुरलेले आहेत असे म्हटले आहे. प्रत्यक्षात शर्मिष्ठा तारकासमुहातील तारे ५४ ते ६१५ प्रकाशवर्ष एवढ्या अंतरामध्ये विखुरलेले आहेत. तर मृग तारकासमुहातील तारे २४३ ते १३५९ प्रकाशवर्ष एवढ्या प्रचंड अंतरामध्ये विखुरलेले आहेत. यावरून आपल्याला तारे एकमेकांपासून मोठ्या अंतराने दूर असताना पृथ्वीवरून पाहताना ते एकत्र समूहात दिसतात.